शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हातभट्ट्यांवर धाडसत्र

By admin | Updated: July 18, 2015 01:10 IST

राज्य उत्पादन शुल्क विभाग गोंदिया कार्यालयाने अवैध हातभट्टी, मोहा दारु गाळणाऱ्या व विक्री करणाऱ्यांविरोधात ...

एक्साईजची कारवाई : २.१५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्तगोंदिया : राज्य उत्पादन शुल्क विभाग गोंदिया कार्यालयाने अवैध हातभट्टी, मोहा दारु गाळणाऱ्या व विक्री करणाऱ्यांविरोधात तिरोडा तालुक्यात राबविलेल्या विशेष धाडसत्रात ९ गुन्हे नोंदविण्यात आले. यात ३ आरोपींना मुंबई दारुबंधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. या मोहिमेत एकूण ७५ लिटर हातभट्टीची दारु, १०४६० लिटर मोहा सडवा व हातभट्टीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य असा एकूण २.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपी शकुंतलाबाई बिंझाडे (४५) रा. रविदास ता.तिरोडा, रंजित बाबुराव बरीयेकर (३०) रा.रविदास वार्ड, ता. तिरोडा व दिनदयाल उके (६०) रा. बोरगाव सर्रा यांच्याविरुद्ध मुंबई दारुबंधी कायदा, १९४९ च्या कलम ६५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक, दुय्यम निरिक्षक गोंदिया व देवरीचे चिटमटवार, बोडेवार, सहाय्यक दुय्यम निरीक्षक हुमे व रहांगडाले, जवान ढाले, फुंडे, उईके, ढोमणे, मुनेश्वर व वाहनचालक सोनबर्से यांनी केली. राज्य उप्पादन शुल्क गोंदिया विभागाने जून महिन्यात जिल्हाभरात राबवलेल्या धाडसत्रात एकूण ७९ गुन्हे नोंदवण्यात आले असून ४५ वारस गुन्ह्यांमध्ये ४७ आरोपींना अटक करण्यात आली. तसेच जून महिन्यात विभागाकडून ७९० लिटर हातभट्टी मोहा दारु, २९४३९ लिटर मोहा सडवा, २१९ मोहा फुले, १४० लिटर देशी दारू, ५ लिटर विदेशी दारु व ३ दुचाकी वाहने असा एकूण ७.८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)जास्त दराने मद्यविक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाईजून महिन्यात विभागाकडून जिल्ह्यातील मद्य विक्री अनुज्ञप्त्याचे (लायसन्स) अचानकपणे निरीक्षण करण्यात आले असून एमआरपीपेक्षा जास्त दराने मद्य विक्री केलेल्या २ वाईन शॉप व ५ किरकोळ देशी दारु दुकानांवर विभागीय विसंगती प्रकरण नोंदवण्यात आले आहे. तसेच इतर नियमभंग प्रकरणी ७ मद्य अनुज्ञप्त्यांवरही विभागाने विसंगती प्रकरण नोंदविले आहे. जिल्ह्यात अवैध दारुविरोधात धडक मोहिमा राबवून हातभट्टीची दारु तसेच बनावट दारु तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील सर्व मद्य अनुज्ञप्तीधारकांनीही अनुज्ञप्तीच्या अटी शर्तीचे पालन करावे, अन्यथा अनुज्ञप्तींवर नियमभंगाचे प्रकरण नोंदवण्यात येईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गोंदिया येथील अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिला आहे.