लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : डुंडा येथील नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचायत समितीच्या चौकशी अधिकाºयांनी शौचालय धारकांची चौकशी केली. यात तीन शौचालय अर्धवट व जुने असल्याचे आढळले. मात्र त्यांचे देयक काढण्यात आल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले.ग्रामपंचायत कार्यालय डुंडा येथील नागरिकांनी, १५ आॅगस्टची तहकूब सभा ग्रामविकास अधिकारी बी.सी. हुड यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी घेणे अनिवार्य होते, परंतु ती सभा घेतली नाही तसेच गावामध्ये सरपंच व ग्रामविकास अधिकाºयाने जुने शौचालय दाखवून देयक दिले, अशी तक्रार पं.स. सडक अर्जुनी येथील खंडविकास अधिकाºयांना दिली होती. या तक्रारीनुसार पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी एम.एस. खुणे यांनी प्रत्येक शौचालय धारकाची चौकशी केली. यात तीन शौचालय अर्धवट व जुने असून देयक दिल्याचे निदर्शनास आले आहे.तसेच वर्षातून चार ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे. त्यापैकी १५ आॅगस्टची ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळे त्यांची चौकशी करुन तक्रारकर्ते याचे बयान घेण्यात आले. यामध्ये उपसरपंच भरतलाल ढलाल, विठ्ठल चिदालोरे, माणिकचंद बागडकर, रविंद्र ब्राम्हणकर यांनी आपले लेखी बयान विस्तार अधिकाºयांना सादर केले.विस्तार अधिकाºयांनी दोन ते तीन दिवसांमध्ये लेखी अहवाल वरिष्ठ अधिकाºयांना सादर करणार असल्याचे सांगितले.आता त्यावर संबंधित वरिष्ठ अधिकारी हे डुंडाचे सरपंच व ग्रामविकास अधिकाºयांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देयक देऊनही तीन शौचालये अर्धवट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 21:12 IST
डुंडा येथील नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचायत समितीच्या चौकशी अधिकाºयांनी शौचालय धारकांची चौकशी केली. यात तीन शौचालय अर्धवट व जुने असल्याचे आढळले.
देयक देऊनही तीन शौचालये अर्धवट
ठळक मुद्देडुंडा ग्रामपंचायतची चौकशी : तक्रारकर्त्यांचे घेतले बयान