शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलच्या सेवेचे तीन-तेरा

By admin | Updated: July 17, 2015 01:21 IST

तालुक्यातील बीएसएनएलची लॅडलाईन दूरध्वनी सेवा गेल्या एक महिन्यापासून विस्कळीत झाली आहे.

देवरी तालुका : विस्कळीत सेवेमुळे अनेक कामे रेंगाळली देवरी : तालुक्यातील बीएसएनएलची लॅडलाईन दूरध्वनी सेवा गेल्या एक महिन्यापासून विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अनेकांची कामे ठप्प पडली आहे. मात्र संबंधित अधिकारी वर्ग झोपेचे सोंग घेऊन मुग गिळून गप्प बसल्याने सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांची ससेहोलपट होत आहे. तालुक्यातील सुरू असणारी दूरध्वनी सेवा ही फक्त काही मर्यादित कालावधीसाठी सुरू असते. तसेच देवरी येथील एक्सचेंजकडे वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तालुक्यात बीएसएनएलचे मोबाईल टॉवर पूर्ण क्षमतेने रेंज देत नाहीत. रेंज दारात असते मात्र रेंज घरात नसते, अशी येथील परिस्थिती आहे. त्यामुळे लॅडलाईनशिवाय पर्याय नसल्याने नागरिकांची एका रुपयात होणाऱ्या कामासाठी बरीच पायपीट करावी लागते. तसेच वेळ व पैशाचे नुकसानही सहन करावे लागते. देवरी एक्सचेंज अंतर्गत येणाऱ्या शेकडो गावात एक दिवस चालू तर दहा दिवस बंद, अशी अवस्था असते. या त्रासापायी कित्येकांनी बीएसएनएलची सेवा बंद केली असून खासगी सेवा पत्करली आहे. देवरी एक्सचेंजमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग असून एका अभियंत्यावर तालुक्याच्या कामाचा भार आहे. स्पर्धेच्या युगात लॅडलाईन सेवा टिकवायची असेल तर येथील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे ग्राहकांना सेवा पुरविणे गरजेचे आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात सहकारी बँका, ग्रामपंचायत, पतसंस्था, सरकारी कार्यालय तसेच व्यापारी लोकांकडे बीएसएनएलची सेवा वापरली जाते. मात्र गेले वर्षभर दूरध्वनी सेवा, फॅक्स, इंटरनेट आदी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे ग्राहकांनी दाद मागायची तरी कुणाकडे? अशी विपरित परिस्थिती तालुक्यातील जनतेची झाली आहे. महिन्यातून जेवढे दिवस दूरसंचार सेवा बंद असते तेवढी रक्कम त्यांच्या बिलातून कपात करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)