शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अन्न व औषध प्रशासन विभागाची तीन ठिकाणी धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:49 IST

दिवाळीच्या दिवसात भेसळ होण्याचे प्रकार नेहमीच पुढे येतात. या दरम्यान अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारीदेखील तत्पर असतात. १३ ते १७ आॅक्टोबर दरम्यान गोंदियात तीन कारवाया करून डालडा जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देडालडा जप्त : ४७ किलो छेना केला नष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीच्या दिवसात भेसळ होण्याचे प्रकार नेहमीच पुढे येतात. या दरम्यान अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारीदेखील तत्पर असतात. १३ ते १७ आॅक्टोबर दरम्यान गोंदियात तीन कारवाया करून डालडा जप्त करण्यात आला. अ‍ॅग्मार्क नसलेला तेल जप्त केला तर रसगुल्ला तयार करण्यासाठी वापरण्यात येणाºया छेनामध्ये किडे आढळल्याने ४७ किलो छेना नष्ट करण्यात आला.१३ आॅक्टोबर रोजी गोंदियातील दिलीप भगवानदास सलुजा यांच्या किराणा दुकानात रूची वनस्पती नावाचा डालडा २ क्विंटल ५३ किलो किंमती २५ हजार ३५६ रूपयाचा माल जप्त करण्यात आला. १६ आॅक्टोबर रोजी गोंदियातील हरगुन बजाज यांच्या शिव आॅईल मूर्री रोड गोंदिया येथे केशव ब्रॉन्ड नावाचे १ क्विंटल ९ किलो वजनाचा तेल जप्त करण्यात आला. १७ आॅक्टोबर रोजी सुजाता बोस यांच्या मिठाईच्या कारखाण्यावर धाड टाकण्यात आली. कस्तुरबा वॉर्डाच्या तिवारी धर्मशाळेमागे आनंद मिष्ठान्न भंडारची मिठाई तयार करण्याचा कारखाना आहे. त्या कारखान्यात बंगाली मिठाई रसगुल्ला तयार करण्यासाठी वापरण्यात येणाºया छेनामध्ये किडे पडलेले दिसल्याने ४७ किलो छेना जप्त करून कारवाई करण्यात आली.आनंद मिष्ठान्न भंडार या दुकानाचा परवाना आहे. परंतु ज्या ठिकाणी ही मीठाई तयार केली जात आहे त्या कारखान्याचा परवानाही नसल्याचे अधिकाºयांनी सांगितले.सदर कारवाई अन्न सुरक्षा विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अखीलेश राऊत, पियुष मानवटकर यांनी केली.