शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू

By नरेश रहिले | Updated: June 8, 2025 17:50 IST

तिन्ही मृतक नागपूरच्या हिंगणा येथील: रावणवाडी पोलिसात मृत्यूची नोंद

गोंदिया: लहान मुलाच्या पिंडदान करण्यासाठी गोंदिया तालुक्याच्या कोरणी घाटावर गेलेल्या आई व दोन मावस बहिणींचा कोरणी घाटातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना ८ जून रोजी दुपारी १२:३० वाजता घडली. मिरा ईसुलाल तुरकर (५५), मिनाक्षी संतोष बघेले (३६) व स्मीता शत्रुघ्न टेंभरे (३९) तिन्ही रा. राजीवनगर वॉर्ड क्रमांक ४ हिंगना नागपूर अशी मृत महिलांची नावे आहेत.

मृतक मिरा ईसुलाल तुरकर यांच्या लहान मुलगा मुकेश तुरकर याचे निधन ३० मे २०२५ रोजी आजाराने झाल्याने त्याच्या पिंडदानासाठी गोंदिया तालुक्याच्या कोरणी घाटावर ८ जून रोजी दुपारी २ वाजता २० ते २५ लोक आले होते. दुपारी १२.३० वाजता पूजा करण्यापूर्वी आंघोळीसाठी महिला मंडळी घाटात उतरल्या. मुकेश तुरकरची वहीणी गायत्री राजेश तुरकर ह्या आंघोळ करीत असतांना त्यांचा पाय घसरल्याने त्या पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी मिनाश्री संतोष बघेले (३६) हिने पाण्यात उडी घेतली. परंतु तिही बडून लागली. दोघ्याही बुडत असतांना पाहून स्मीता शत्रुघन टेंभरे (३०) हिने पाण्यात उडी घेत वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ती देखील पाण्यात बुडाली. तिघ्या बुडत असल्याचे पाहून मिरा ईसुलाल तुरकर (५५) ह्या त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असतांना या प्रयत्नात त्या स्वत:चा जीव गमावून बसल्या. या घटनेची नोंद रावणवाडी पोलिसांनी घेतली आहे. तपास पोलीस निरीक्षक वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

लहान मुलाच्या ओरडण्याने गायत्रीचा जीव वाचलात्या चौघ्याही बुडत असल्याचे पाहून याच पिंडदानासाठी आलेल्यांपैकी एका मुलाने हा प्रकार पाहून आरडाओरड केली. त्यामुळे पिंडदानाची प्रक्रीयात असलेल्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यातील एकाने लगेच पाण्यात उडी घेऊन गायत्री राजेश तुरकर यांना वाचविले. परंतु मिनाश्री संतोष बघेले (३६), स्मीता शत्रुघन टेंभरे (३९) व मिरा ईसुलाल तुरकर (५५) यांना वाचविण्यात अपयश आले. त्या तिघींचा बुडून मृत्यू झाला.

ते मृतक मुळचे गोंदिया तालुक्यातीलया घटनेतील तिन्ही मृतक गोंदिया तालुक्याच्या गिरोला कन्हारटोला येथील मृळचे आहेत. रोजगाराच्या शोधात ते नागपूर हिंगनाोथे गेल्याने काही वर्षापासून ते त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. परंतु आपल्या पुर्वजांचे पिंडदान कोरणी घाटावरच होत असल्याने मुकेश तुरकर यांच्या पिंडदानाचाही कार्यक्रम कोरणी घाटावरच करून असा घरच्यांची धारणा बनली. त्यामुळे ते नागपूरवरून कोरणी घाटावर आले होते.

 

टॅग्स :gondiya-acगोंदियाDeathमृत्यूdrowningपाण्यात बुडणे