शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांत ८४ बालके कुपोषणमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 06:36 IST

गोंदिया जिल्ह्यातील कुपोषित बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात राष्ट्रीय पोषाहार पुनर्वसन केंद्र सुरू झाले.

- नरेश रहिले गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील कुपोषित बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात राष्ट्रीय पोषाहार पुनर्वसन केंद्र सुरू झाले. या केंद्रात मागील तीन महिन्यांत दाखल केलेल्या ९४ बालकांपैकी ८४ बालके कुपोषणाच्या श्रेणीतून बाहेर पडले आहेत.जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील अंगणवाडी, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयातून कुपोषणग्रस्त बालकांना १४ दिवसांसाठी या पोषाहार पुनर्वसन केंद्रात दाखल केले जाते. गावपातळीवर व्हीसीडीसी व प्राथमिक आरोग्य केंद्र पातळीवर महिनाभर सीटीसी या विशेष शिबिरातून ही वजन न वाढणारी बालके येथे दाखल केली जातात. केंद्रात बालरोग व आहारतज्ज्ञ, तसेच समुपदेशिका यांच्या संयुक्त पथकाने तीव्र कुपोषित बालकांवर उपचार केले.बालकांस सारिका तोमर व स्वाती बंसोड यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वेळा पोषण आहार देण्यात आला. बालरोगतज्ज्ञ डॉ. देशमुख यांनी बालकांना अत्यावश्यक मायक्रो सप्लिमेंट्स व व्हिटामिन ए व डी चे डोसेज देण्याचा सल्ला दिला. त्यातून ८४ बालकांना नवसंजीवनी मिळाली.मागील पंधरवड्यात तुमखेडा येथून आलेल्या ८ महिन्यांच्या बाळाचे वजन फक्त दीड किलो होते. पोषाहार पुनर्वसन केंद्रातून प्रभारी अधीक्षिका डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्या मार्गदर्शनात पोषाहार उपचाराला प्रतिसाद दिल्याने कुपोषणग्रस्त बालकाचे वजन १४ दिवसांत चक्क ३.७५० किलोग्राम झाले.>१० बालके दुर्धर आजारांनी ग्रस्ततीन महिन्यांत दाखल ९४ बालकांपैकी १० बालकांची स्थिती सुधारलेली नाही. त्यांना दुर्धर आजार व व्यंग आहे. गर्भवतींची योग्य काळजी न घेतल्याने बाळांची वाढ झालेली नाही.