शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा तीन आकडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 22:20 IST

गोंदिया जिल्ह्यात ऑगस्ट महिन्या दोन आकडी असलेला कोरोना रुग्ण वाढीचा वेग सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच तीन आकडी झाला आहे

ठळक मुद्देदोन दिवसात चार बाधितांचा मृत्यू१३७ कोरोना बांधितांची नोंदसंसर्ग वाढतोय झपाट्याने, उपाययोजनांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्या दोन आकडी असलेला कोरोना रुग्ण वाढीचा वेग सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच तीन आकडी झाला आहे. बुधवारी (दि.२) एकाच दिवशी १३७ कोरोना बाधितांची नोंद झाली असून एका बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर दोन दिवसात चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. रुग्ण वाढीचा वेग तीन आकडी झाल्याने जिल्हावासीयांना वेळीच सावध होत काळजी घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर दीड महिन्यात एकही रुग्ण आढळला नाही. मार्च ते जुलै दरम्यान २८८ कोरोना बाधित आढळले होते तर सहा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. मात्र ऑगस्ट महिन्यात यात विक्रमी वाढ झाली. एकट्या ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात ११९४ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर १६ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग दोन आकडी होता. मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच यात वाढ झाली आहे.

कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या संख्येत सुध्दा वाढ होत असल्याने जिल्हा वासीयांची चिंता वाढली आहे. तर ३५ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केल्याने थोडा दिलासा देखील मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६८५ रुग्ण कोरोना पाझिटिव्ह आढळले असून यापैकी १०११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आही. जिल्ह्यात सध्यास्थितीत ६६९ कोरोना एक्टिव्ह रुग्ण आहेत.

गोंदिया शहरात सर्वाधिक रुग्णजिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून कोरोना बाधित रुग्णांचा आकडा आता तीन आकडी झाला आहे. तर सर्वाधिक रुग्ण हे गोंदिया शहरातील आहे. आतापर्यंत शहरात ८०० वर कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. बुधवारी सर्वाधिक ८४ कोरोना बाधित रुग्ण हे गोंदिया शहरात आढळले आहे.त्यामुळे संपूर्ण शहरच कोरोनाच्या विळख्यात आले आहे. त्यामुळे शहरवासीयांना विशेष काळजी घेण्याची गरज असून आरोग्य विभागाने दिलेल्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.

नगर परिषदेत कोरोनाचा शिरकावगोंदिया नगर परिषदेतील दोन कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली असून खबरदारीचा उपाय म्हणून बुधवार आणि गुरूवारी (दि.३) नगर परिषद बंद ठेवण्यात आली आहे. मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्या निर्देशानंतर नगर परिषदेच्या इमारतीचे सॅनिटायझेशन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान शहरातील बहुतेक कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला असून यातून आता नगर परिषद सुध्दा सुटलेली नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस