शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

वाघाच्या शिकार प्रकरणातील तीन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 05:00 IST

गोंदिया वनविभागांतर्गत मुंडीपार सहवनक्षेत्रातील चुटिया नियतक्षेत्रात येत असलेल्या लोधीटोला येथील शेतात १५ नोव्हेंबर रोजी वाघ मृतावस्थेत आढळला. या वाघाच्या शिकारीचा तपास १६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला. गोंदिया वनविभागाचे श्वान पिटर व नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र येथील श्वान रामू यांच्या मदतीने घटना स्थळाची तपासणी करुन गुन्ह्यातील पुरावे गोळा केले.

ठळक मुद्देकरंट लाऊन वाघाची शिकार : ३० नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी

    लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  तालुक्यातील लोधीटोला येथील शेतशिवारात वाघाची करंट लावून शिकार करणाऱ्या तिघांना वनाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहेत. त्या आरोपींनी वाघाची शिकार केल्याचे कबूल केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत वनकोठडी सुनावली आहे.गोंदिया वनविभागांतर्गत मुंडीपार सहवनक्षेत्रातील चुटिया नियतक्षेत्रात येत असलेल्या लोधीटोला येथील शेतात १५ नोव्हेंबर रोजी वाघ मृतावस्थेत आढळला. या वाघाच्या शिकारीचा तपास १६ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला. गोंदिया वनविभागाचे श्वान पिटर व नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र येथील श्वान रामू यांच्या मदतीने घटना स्थळाची तपासणी करुन गुन्ह्यातील पुरावे गोळा केले. मृत वाघाचे अवशेष आढळलेल्या शेतकऱ्यांना व इतर संशयीत इसमाना या प्रकरणात चौकशीकरीता उपवनसंरक्षक कार्यालय गोंदिया येथे बोलवून बयान नोंदविण्यात आले. अखेर चौकशी दरम्यान रोशनलाल खेमलाल बघेले व मुकेश रोशनलाल बघेले दोन्ही रा. लोधीटोल, बालचंद सोनू राणे रा.चुटिया यांनी करंट लावून वाघाची शिकार केल्याचे तपासात आढळूण आले आहे. आरोपी मुकेश याने २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शेतशिवारात ज्याठिकाणी वाघ मारला ते ठिकाण दाखविले. त्यानंतर ज्यामार्गाने ज्याठिकाणी मृत वाघाचे अवशेष तुकडे टाकले ते ठिकाण दाखविले. मुकेशने वाघाचे तुकडे करण्याकरीता वापरलेली कुऱ्हाड स्वत:च वनाधिकाऱ्यांना दिली. मुकेश व रोशनलाल यांना प्रथम श्रेणी,न्यायदंडाधिकारी गोंदिया यांचे समोर २६ नोव्हेंबर रोजी हजर करण्यात आले होते. न्यायालयाने एक दिवसाची वनकोठडीचे आदेश दिले होते. आरोपी बालचंद सोनू राणे याला २६ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले २७ नोव्हेंबर रोजी सर्व आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० नोव्हेंबरपर्यंत वन कोठडी सुनावली आहे. या कारवाईसाठी लोधीटोलाचे पोलीस पाटील इंदुबाई रहांगडाले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गजानन कावळे व मानद वन्यजिव रक्षक मुकुंद धुर्वे यांनी सहकार्य केले. ही कारवाई उपवनसंरक्षक गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवनसंरक्षक आर.आर. सदगीर, वनक्षेत्राधिकारी एस.के.आकरे, वनक्षेत्रपाल एस.एस.म्हसकर,क्षेत्र सहाय्यक एस.आर.श्रीवास्तव ,बी.डी. दखने, एस.जे.दुर्रानी, एल.एस.अग्नीहोत्री, जे.एन. फटींग,आर.जे. भांडारकर, एन.पी. वैद्य यांनी केली आहे.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग