शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

हजारो कामगार, नोंदणी मात्र २३१ ची

By admin | Updated: July 30, 2015 01:34 IST

इमारत व इतर कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने सन २००७ च्या नियम ४५ मध्ये अनेक उपयायोजना केल्या.

कंत्राटदारांची नोंदणीच नाही : योजनांच्या लाभापासून वंचितगोंदिया : इमारत व इतर कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने सन २००७ च्या नियम ४५ मध्ये अनेक उपयायोजना केल्या. त्या योजनांचा लाभ कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी असलेल्या कामगारांनाच देण्यात येत आहे. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत असलेले कंत्राटदार विविध इमारती, शासकीय कार्यालय, बंधारे, पूल, आवारभींत व रूग्णालये तयार करतात. या कामांवर हजारो कामगार काम करीत असतात. परंतु कंत्राटदारांनीच आपल्या कामाची नोंदणी कामगार कार्यालयाकडे न केल्यामुळे या कंत्राटदारांकडे काम करणारे कामगार शासनाच्या लाभापासून वंचीत आहेत. बांधकाम करणाऱ्या कामगारांसाठी शासनाने अनेक योजना अमंलात आणल्या. मात्र त्यांना राबवून घेणाऱ्या कंत्राटदारांनी आपल्या काम व कमगारांची कामगार आयुक्तांकडे नोंदच केली नसल्यामुळे जिल्ह्यात १० हजारांहून अधिक कामगारांचे कंत्राटदारांकडून शोषण होत आहे. त्याच बरोबर नोंदणी नसल्यामुळे या कामगारांना शासकीय योजनांपासून वंचीत राहावे लागत आहे.कामगार कार्यालयात आपल्या कामाची नोंदणी केल्यावर त्या कामगारांचे पीएफ कपेल व त्यात अर्धे पैसे आपल्यालाही टाकावे लागतील यामुळे जिल्ह्यातील शेकडो कंत्राटदारांनी आपल्या कामाची नोंदणी कामगार कार्यालयाकडे केली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम करणाऱ्या कंत्राटदारांनी १९७० च्या कामगार आयुक्त कार्यालयाच्या नियमानुसार प्रत्येक कंत्राटदारांनी काम करण्यासाठी आधी कामगार कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. या संदर्भात शासनाने १९९७ मध्ये कायदाही तयार केला. परंतु जिल्ह्यातील बहुतांश कंत्राटदारांनी नोंदणी न करताच कोट्यवधीची कामे केली आहेत. एका कामावर १० पेक्षा अधिक कामगार असतील किंवा १० लाखपेक्षा अधिकचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी आपल्या कामाची नोंदणी कामगार कार्यालयाकडे करणे गरजेचे आहे. परंतु कंत्राटदारांनी व संबधित अधिकाऱ्यांनी कामगार कायद्याला बाजूला सारून कामगारांचे शोषण करणे सुरूच ठेवले. जिल्ह्याच्या आठ तालुक्याची परिस्थिती पाहता १० हजारांपेक्षा अधिक कामगार जिल्ह्यात आहेत. मात्र कंत्राटदारांच्या चुकीमुळे ते कामगार आज असुरक्षित असून शासनाच्या अनेक योजनांपासून वंचीत आहे. कंत्राटदारांनी आपण काम करीत असल्याची नोंदणी करावी, यासंदर्भात कामगार सहायक आयुक्त कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनबंधू यांना पत्र दिले. परंतु त्यांच्याकडूनही कामगार कार्यालयाला सहकार्य मिळाले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागही कामगारांचे शोषण करण्यात अप्रत्यक्षरित्या कंत्राटदारांना सहकार्य करीत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. मात्र यामुळे कामगारांचे मरण होत असल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)नोंद असलेल्या कामगारांना असा मिळतो लाभकामगार कार्यालयात नोंदणी झालेल्या कामगाराच्या मजूरीतील काही रक्कम पीएफच्या खात्यात जमा होईल. त्या रकमेतील अर्धे पैसे कंत्राटदाराला जमा करावे लागतात. प्रत्येक कामगाराचा विमा असतो. आरोग्याची काळजी घेण्यासाठी हेल्थ कार्डचे वाटप केले जाते. कामगारांच्या गुणवंत मुलांना प्रोत्साहनपर बक्षीस व शिष्यवृत्ती देण्यात येते. कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस किंवा पतीस पाच वर्षापर्यंत दरमहा एक हजार रूपये आर्थिक सहाय्य देण्यात येते. घरासाठी व घरदुरूस्तीसाठी पैसे देण्यात येतात. गंभीर आजाराच्या उपचारासाठी मदत, कामगार महिलेच्या सामान्य प्रसूतीसाठी पाच हजार व शस्त्रक्रिया प्रसूतीसाठी १० हजार रूपये व अनेक सोयी देण्यात येतात. जिल्ह्यात फक्त १९८ कामगारांची नोंदजिल्ह्यात १० हजारांपेक्षा अधीक कामगार असतांना फक्त २३१ कामगारांची नोंद आहे. नोंदणी असलेले हे कामगार कुण्या कंत्राटदाराचे कामगार नाहीत. तर शासनाच्या रोहयोच्या कामावर ९० दिवसांपेक्षा अधिक काम करणाऱ्या लोकांचे नाव कामगार म्हणून नमूद करण्यात आले. जिल्ह्यात कामगार नाहीत अशी फजीती होऊ नये यासाठी कामगार कार्यालयाने रोहयोच्या मजूरांची कामगार म्हणून नोंदी घेतल्या आहेत. मात्र खरा कामगार आजही शासनाच्या योजनांना मुकला आहे. घरेलू कामगारांच्या अंत्यविधीसाठी दोन हजारगोंदिया जिल्ह्यात १० हजार घरेलू कामगार आहेत. घरेलु कामगार महिलेचे निधन झाल्यास त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी दोन हजार रूपये तातडीने द्या अशी तरतूद शासनाने केली आहे. तसेच ५५ ते ६० वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना १० हजार रूपये सन्मानधन देण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील १९० लाभार्थ्यांपैकी १४५ लोकांना हे सन्मानधन देण्यात आले तर उर्वरीत लोकांना लवकरच हे सन्मानधन देण्यात येणार आहे.