शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

शेतकऱ्यांचे ११ कोटींचे चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:48 IST

आधीच नैसर्गिक संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना आता शासकीय दप्तर दिंरगाईमुळे आर्थिक संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देशासकीय धान खरेदी केंद्र : मागील वर्षीच्या तुलनेत धान खरेदीत घट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आधीच नैसर्गिक संकटाला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना आता शासकीय दप्तर दिंरगाईमुळे आर्थिक संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे तब्बल ११ कोटी रुपयांचे चुकारे पंधरा दिवसांपासून थकल्याची बाब पुढे आली आहे.हमीभावापेक्षा शेतकऱ्यांना कमी दर मिळू नये, यासाठी शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. यंदा सर्वसाधारणाला धानाला प्रती क्विंटल १५५० आणि अ दर्जाच्या धानाला १५९० रुपये प्रती क्विंटल दर जाहीर केला आहे. मात्र यंदा कमी पाऊस आणि धान पिकांवर कीडरोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. त्याचा धानाच्या दर्जावर देखील काही प्रमाणात परिणाम झाला. धानाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला जात होता. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, याकरिता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत जिल्ह्यात ५७ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर आत्तापर्यंत २ लाख ८३ हजार ६५४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी २६०० शेतकºयांचे ११ कोटी रुपयांचे चुकारे मागील पंधरा दिवसांपासून थकल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करुन बँकेचे कर्ज आणि उधार उसणवारी फेडू अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण, धानाची विक्री करुन चुकारे मिळण्यासाठी पंधरा ते वीस दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात आले आहे. चुकारे केव्हा मिळतील यासाठी शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्राच्या पायºया झिजवित असल्याचे चित्र आहे. मात्र त्यांना दप्तर दिंरगाईचा फटका सहन करावा लागत आहे.एकीकडे शासनाने शासकीय केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना एक ते दोन दिवसात चुकारे देण्याचे आश्वासन दिले होते. दुसरीकडे मात्र त्यांना पंधरा पंधरा दिवस चुकारे मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. या संदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी येत्या चार पाच दिवसात सर्व शेतकऱ्यांना चुकारे देण्यात येणार असल्याचे सांगितले.मागील वर्षीच्या तुलनेत घटकमी पाऊस आणि कीडरोगांचा धानपिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. परिणामी शासकीय धान खरेदी केंद्रावरील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. मागील वर्षी याच तारखेपर्यंत ४ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली होते. तर यंदा २ लाख ८३ हजार ६५४ क्विंटल धान खरेदी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १ लाख क्विंटल धान खरेदीत घट झाली.

टॅग्स :Farmerशेतकरी