शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

३०० ब्रास रेतीचा केला साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 22:37 IST

तालुक्यातील ग्राम पिपरटोला येथील वाघ नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जात आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकाराकडे तहसीलदार दुर्लक्ष करीत असल्याने रेतीमाफीयांनी मोठ्या प्रमाणात रेती चोरुन नेली आहे. तर ३०० ब्रास रेतीचा साठा गावात करुन ठेवला आहे.

ठळक मुद्देवाघ नदीच्या पात्रातून उपसा : ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील ग्राम पिपरटोला येथील वाघ नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जात आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकाराकडे तहसीलदार दुर्लक्ष करीत असल्याने रेतीमाफीयांनी मोठ्या प्रमाणात रेती चोरुन नेली आहे. तर ३०० ब्रास रेतीचा साठा गावात करुन ठेवला आहे.शासनाने ज्या रेती घाटांचा लिलाव केला. त्या घाटातील रेती काढणे सुरु आहे. परंतु ज्या ठिकाणच्या रेतीचा घाटांचा लिलाव झाला नाही. त्या घाटांवरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करुन रेती विक्री केली जात असल्याचे चित्र आहे. नियमाला धाब्यावर बसवून रात्री ९ ते पहाटे ४ वाजतापर्यंत मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जातो. यासंदर्भात ग्रामपंचायत पिपरटोलाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत रेतीचा उपसा करु नका अशी ताकीद रेती माफीयांना दिल्यामुळे रेती माफीयांनी उलट त्यांनाच ठार मारण्याची धमकी दिली आहे. वाघ नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती चोरण्यात आली. चोरलेल्या रेतीपैकी ३०० ब्रास रेतीचा साठा पिपरटोला येथे करुन ठेवल्याचे सरपंचांनी सालेकसाचे ठाणेदार, आमगावचे तहसीलदार, देवरी येथील उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्षरेतीचा उपसा करणाऱ्या रेतीमाफीयांना महसूल विभागाचे पाठबळ असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार किंवा तहसीलदार हे रेती माफीयांवर कारवाई करीत नसल्यामुळे नागरिकांमध्ये महसूल विभागाप्रती आक्रोश आहे. गावकऱ्यांच्या तक्रारीनंतरही रेती माफीयांवर कारवाई केली जात नसल्याने याप्रकराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे.१ लाख १५ हजारांचा एकही दंड नाहीरेती माफीयावर अंकुश बसावा यासाठी शासनाने रेती चोरणाऱ्यांना १ लाख १५ हजार ४०० रुपयांचा दंड करावा असे शासन निर्णयात म्हटले आहे. हा शासन निर्णय निघण्यापूर्वी येथील तहसीलदारांनी रेती चोरणाऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला होता. परंतु यंदा चार कोटींचा महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट असताना एकही रेती माफीयाकडून १ लाख १५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला नाही. शासन निर्णय निघून चार-पाच महिन्यांचा कालावधी लोटला तरी एकावर ही दंड झाला नाही. त्यामुळे नक्कीच कुठेतरी पाणी मुरत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :sandवाळू