शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ज्यांना मूलबाळ नाही त्यांना कुटुंबियांच्या वेदना काय कळणार; नाना पटोलेंचा मोंदीना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2022 20:27 IST

Gondia News ज्यांना मुलं बाळ नाही त्यांना कुटुंबियांच्या वेदना कळणार नाहीत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे केले.

ठळक मुद्देयुक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांवरुन केले वक्तव्य

गोंदिया : आपल्या देशातून कुठली मदत आपल्या देशातील युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थांना मिळालेली नाही. आपल्या देशातील केंद्रीय दूतावाससुद्धा त्या विद्यार्थांचा फोन उचलत नाही. केंद्र सरकार म्हणते तुम्ही काही गडबड करू नका आम्ही सगळं बघून घेऊ. मात्र आज ज्यांचे मुलं त्याठिकाणी शिकत आहेत. त्यांच्या कुटूंबियांना काय वेदना होत असतील. ज्यांना मुलं बाळ नाही त्यांना कुटुंबियांच्या वेदना कळणार नाहीत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे केले.

तालुक्यातील प्रतापगड येथे महाशिवरात्री निमित्त पूजा अर्चा करण्यासाठी ना. पटोले हे मंगळवारी आले होते. यावेळी मीडियाला प्रतिक्रिया देताना बोलत होते. पटोले म्हणाले केंद्रातील सरकार आपल्या देशातील लोकं युक्रेनमधून आणण्यात कमी पडला आहे. हे सत्य आहे आणि त्यांनी हे मान्य केलं पाहिजे. ज्यांना मुले बाळे नाही अश्या लोकांना त्यांच्या वेदना कळणार नाही. युक्रेनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी अडकून आहेत मी स्वतः त्या विद्यार्थ्यांशी फोन वर बोललो त्यांचे व्हिडियो पाहिले भारताच्या विदेश मंत्रालयाशी मी अनेकदा बोलले असून त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

आता पाच राज्याच्या निवडणुका सुरु झाल्या आणि या निवडणुकामध्येच युक्रेनमध्ये युद्ध सुरु होणार होते. असे रशियाच्या माध्यमातून सगळीकडे अल्टिमेट दिले जात होते. तेव्हा ही भारताचे प्रधान सेवक निवडणुकीत व्यस्त होते. मात्र युद्धा आधीच युक्रेनमध्ये असलेल्या बाकी देशांच्या विद्यार्थांना त्यांच्या देशांनी त्यांना स्वदेशात घेऊन जाण्याची सोय केली असल्याचे तिथे अडकलेल्या विद्यार्थानी सांगितले आहे. मात्र आपल्या देशातून कुठली मदत आपल्या देशातील युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थांना मिळालेली नसल्याचा आरोप पटोले यांनी केला.

त्यांना सद्बुध्दी येवोकुठलही ऑपरेशन करा जे बंकर खाली मुलं आहेत त्यांना सुखरुप मायदेशी आणा. त्या ठिकाणातील मुलींचं व्हिडीओ पहिले तर त्या मुलीनं सांगितलं की या ठिकाणावर मुली गायब होत आहेत. मात्र मुलांना मात्र काही करत नाही असे मुलींचे व्हिडीओ येत आहेत. हे सगळं बघून देशाचे पंतप्रधान जागे होणार का असा टोलाही पटोले यांनी लावला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले