शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात सलग तिस-या दिवशी मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 15:39 IST

२० पेक्षा अधिक मार्ग बंद : पुजारीटोला धरणाचे पाच दरवाजे उघडले

गोंदिया : जिल्ह्यात रविवारी (दि.१५) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी (दि.१७) सलग तिसºया दिवशी सुध्दा कायम होता. त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले भरुन वाहत असल्याने २० पेक्षा अधिक मार्ग बंद झाले होते. तर गोंदिया, आमगाव व सालेकसा तालुक्यातील काही वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली. बाघ नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पुजारीटोला धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले. 

जिल्ह्यात मागील चौवीस तासात चार तालुक्यात अतिवृष्टी झाली असून सर्वाधिक १९१.८५ मि.मी.पावसाची नोंद आमगाव तालुक्यात झाली.सालेकसा तालुक्यात १७३.६७ मि.मी, अर्जुनी मोरगाव तालुक्यात ९५.२० व गोरेगाव तालुक्यात १२८.३३ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. हा या तालुक्यातील आत्तापर्यंतचा सर्वाधिक पाऊस आहे.जिल्ह्यातील एकूण ३३ महसूल मंडळापैकी २१ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मागील चौवीस तासात १०५.६१ मि. मी. पावसाचीे नोंद झाली आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे मदत कार्य सुरू करण्यास अडचण निर्माण झाली होती. आमगाव तालुक्यातील बनगाव गावाला पाण्याने वेढा घातल्याने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. सालेकसा तालुक्यातील नदी काठलगत असलेल्या गावांना पावसाचा जोरदार फटका बसला. गोंदिया शहरातील शास्त्रीवार्ड, सुर्याटोला, महालक्ष्मी राईसमिल परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. दरम्यान नागरिकांची ओरड वाढल्यानंतर नगर परिषदेने उपाय योजनेला सुरूवात केली. दरम्यान मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन प्रभावित झाल्याचे चित्र होते. या मार्गावरील वाहतूक ठप्प जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पांगोली नदीवरील पुलावरुन पाणी वाहत असल्याने गोरेगाव-सोनी-ठाणा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर आमगाव-देवरी मार्गावरील नाल्याला पूर आल्याने आमगाव-देवरी, सालेकसा-देवरी, आमगाव-कामठा, आमगाव-वडेगाव, बिजेपार-साखरीटोला, बिजेपार- अंजोरा, बोरकन्हार, बिजेपार-सालेकसा-गांधीटोला, सालेकसा-राजनांदगाव मार्ग बंद होता. कमरगाव नदीवरील पुलावर पाणी असल्याने मुंडीपार-तेढा या गावाचा संर्पक तुटला होता. आमगाव-शिवणी, आमगाव-चिरचाळबांध, आमगाव-तिगाव या मार्गावरील वाहतूक सुध्दा चार ते पाच तास ठप्प झाली होती. जिल्ह्यात तालुका निहाय पडलेला पाऊसतालुका                  झालेला पाऊसगोंदिया                      ६०.६४ मि.मी.गोरेगाव                     १२८.३३ मि.मी.तिरोडा                      ५३.४६ मि.मी.अर्जुनी मोरगाव            ९५.२० मि.मी.आमगाव                     १९१.८५ मि.मी.सालेकसा                    १७३.६७ मि.मी.

जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा इटियाडोह     ३४.७१ टक्के सिरपूर          १५.७३ टक्केपुजारीटोला     ७९.६८ टक्केकालीसरार       ४४.८४ टक्केसंजय सरोवर    ३६.९५ टक्के