शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो गाण्यांवर थिरकले तरूण

By admin | Updated: July 1, 2014 01:34 IST

लोकमत युवा नेक्स्ट, बाल विकास मंच व इंडियन मेडीकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी स्थानिक जैन कुशल भवनात आयोजित जस्ट डान्स २०१४ या स्पर्धेत मराठी,

गुणवंतांचा सत्कार : अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दिले प्रोत्साहनगोंदिया : लोकमत युवा नेक्स्ट, बाल विकास मंच व इंडियन मेडीकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी स्थानिक जैन कुशल भवनात आयोजित जस्ट डान्स २०१४ या स्पर्धेत मराठी, हिंदी अशा शेकडो गाण्यांवर तरूण-तरूणीचे व बालकांचे पाय थिरकले. आपल्यातील कला, कौशल्याचे प्रदर्शन येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला अतिथी म्हणून नगरसेवक अशोक (गप्पू) गुप्ता, नगरसेवक राहुल यादव, लोकमत कार्यालय प्रमुख प्रशांत मिश्रा उपस्थित होते. लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या जस्ट डान्स २०१४ स्पर्धेत नाच मयूरी, अप्सरा आली, राधा ही बावरी, लुंगी डान्स, गणेश वंदना, कत्थक, लावणी, लोकनृत्य, समूह नृत्य सादर करण्यात आले. सकाळी ११ वाजतापासून सायंकाळी ६ वाजतापर्यंत कार्यक्रम सुरू राहिले. जस्ट डान्स ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. एकल नृत्यात पहिला गट इयत्ता ३ ते ६ चा होता. या गटात प्रथम क्रमांक प्रोग्रेसिव्ह स्कूल येथील सिध्दी क्षिरसागर, व्दितीय नितेश गवळी, दुसरा गट ७ ते ९ चा होता. यात प्रथम दिया धर्वे, व्दितीय मोहिनी ठरली. तृतीय गट युवकाचा होता. यात हितेश गवळी यांनी प्रथम तर आभाने व्दितीय क्रमांक पटकाविला. समूह नृत्य स्पर्धेत प्रथम गटात स्पार्कप अ‍ॅकेडमी गोंदियाच्या चमूने तर व्दितीय क्रमांक कान्हा ग्रुप आमगावने पटकाविला. दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक जी-९ ग्रुप गोंदिया तर दुसरा क्रमांक युनिक ग्रुप गोंदियाने पटकाविला. यावेळी इयत्ता दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या हस्ते करण्यात आला. दहावीतील गुणवंत विद्यार्थी आकाश कोतवाल, दीपिका वाघमारे, अभिषेक रहांगडाले, पूनम तुरकर, शामिल मिश्रा, भारती बजाज, मनीष खंडेलवाल, आयुष खंडेलवाल, योगेश बजाज, प्रफुल रहांगडाले, बारावीतील प्रशांत पारधी, मोनाली कावळे, नंदकिशोर उरकुडे, हितेश कोरे, स्वप्निल राठी, संजीव लाल, वैभव गहाणे, नेहाल शेंडे, आस्था पांडे आणि ग्रीष लालवानी यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी नियमितपणे अभ्यास केला, पाहिजे ते यश सहजरीत्या मिळविता येते. कठीण परिश्रमातूनच यशाची दारे उघडी होतात. यासाठी कठीण परिश्रम घेण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवायला हवी. कार्यक्रमादरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. घनश्याम तुरकर यांनी भेट दिली. ते विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले, आम्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. गुणवंत विद्यार्थ्यांनी भविष्यात यशस्वीरीत्या वाटचाल करावी यासाठी शुभेच्छा देत त्यांनी बेटी बचाव व रक्तदानावर मार्गदर्शन करण्यात आले. जस्ट डान्स स्पर्धेचे परीक्षण भंडाराचे लिकेश खेताडे, भरत चौरसिया यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन मराठी अभिनेता महेश सोनी व लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत यांनी केले. समारोपीय कार्यक्रमाला प्रताप मेमोरियल ट्रस्टचे सचिव प्रफुल अग्रवाल, लायन्स क्लब ग्रीनसिटीचे अध्यक्ष अपूर्व अग्रवाल, गगन अग्रवाल, लोकमत बालविकास मंचचे संयोजक श्रीकांत पिल्लेवार, मनीष रहांगडाले, प्रमोद गुडधे, उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना प्रफुल्ल अग्रवाल म्हणाले, सामाजिक बांधिलकी ठेवून लोकमत अनेक वर्षापासून कार्य करीत आहे. लोकमतचे कार्य वाखाणण्याजोगे असून बाल, तरूण व ज्येष्ठांसाठी अनेक कार्यक्रमांची मेजवानी लोकमतकडून दिली जाते, असे ते म्हणाले. यशस्वीतेसाठी रोशन बोहरे, दर्पण माने, लकी भोयर, मीना दीक्षित, धर्मराज काळे, संतोष बिलोणे व लोकमत युवा नेस्टच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)