शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

त्यांना गढूळ पाण्याने भागवावी लागते तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 11:24 PM

बाबाटोली येथे दोन बोअरवेल आणि नळ योजनेच्या माध्यमातून येथील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. मात्र सध्या स्थितीत हे दोन्ही साधने नाममात्र ठरत आहे. येथील फकीर समाजाच्या लोकांना गढूळ पाण्याने आपली तहान भागवावी लागत आहे.

ठळक मुद्देबोअरवेल नादुरुस्त : बाबाटोलीवासीयांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : बाबाटोली येथे दोन बोअरवेल आणि नळ योजनेच्या माध्यमातून येथील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. मात्र सध्या स्थितीत हे दोन्ही साधने नाममात्र ठरत आहे. येथील फकीर समाजाच्या लोकांना गढूळ पाण्याने आपली तहान भागवावी लागत आहे. परिणामी बाबाटोलीवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सालेकसा नगर पंचायतमध्ये समावेश झालेली बाबाटोली यापूर्वी आमगाव खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येत होती. या टोलीमध्ये आतापर्यंत केवळ दोन बोअरवेल खोदण्यात आले. बोअरवेल काही दिवस चालले त्यानंतर त्या बंद पडल्या आहेत. मात्र तेव्हापासून या बोअरवेलची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे दोन्ही बोअरवेल आजही नादुरुस्त आहेत. एवढेच नाही तर त्या बोअरवेलचे काही साहित्य सुद्धा गायब झालेले आहे. अशात रेकार्डवर जरी दोन बोअरवेलची नोंद असली तरी प्रत्यक्षात मात्र त्याचा काहीच उपयोग नाही. बाबाटोलीवासीयांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे म्हणून यापूर्वी स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रयत्नाने मुख्य मार्गालगत एका बोअरवेलमध्ये पाईपद्वारे पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या बोअरवेलची पाण्याची पातळी खोलवर गेली. त्यामुळे फार कमी प्रमाणात पाणी मिळते. परिणामी सुरुवातीच्या दहा बारा घरांना काही प्रमाणात पाणी मिळते. त्यानंतरच्या घरातील लोकांना पाणीच मिळत नाही. नळ योजनेची पाईप लाईनसुद्धा अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. येथील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांनी खड्डे खोदले. तसेच या खड्डयातील गढूळ पाण्याने ते आपली तहान भागवित असल्याचे चित्र आहे. बरेचदा याच पाण्याचा उपयोग स्वयंपाक व पिण्यासाठी करावा लागत असल्याचे येथील महिलांनी सांगितले. मात्र त्यांच्या समस्येकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेले नाही. काही लोक आपल्या गरजेसाठी ग्रामीण रुग्णालय परिसरातून पाणी आणायला जातात. मात्र येथील लोक त्यांना आपल्या मोहल्यात पाण्यासाठी येऊ देत नाही. अशात बाबाटोलीवासीयांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे.पाण्याच्या टाकीची सोय करुन त्याद्वारे पाणी पुरवठा केल्यास पाणी सहजतेने बाबाटोलीत पोहोचू शकते. यासाठी पाईप लाईनची दुरूस्ती करण्याची गरज आहे. तेव्हाच प्रत्येक घरापर्यंत पाणी मिळू शकले.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण