शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

रेती घाटांच्या लिलावाचा मार्ग होणार मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:20 IST

संपूर्ण राज्यभरातच रेती घाटांचे लिलाव न झाल्याने अनेक बांधकाम रखडली आहेत. तर रेती घाटांवरुन रेतीचा मोठ्या प्रमाणात अवैध उपसा सुरू आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून रेतीची अधिक दराने विक्री केली जात असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

ठळक मुद्देपर्यावरण समितीने मागविली माहिती : रेती तस्करीला बसणार आळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संपूर्ण राज्यभरातच रेती घाटांचे लिलाव न झाल्याने अनेक बांधकाम रखडली आहेत. तर रेती घाटांवरुन रेतीचा मोठ्या प्रमाणात अवैध उपसा सुरू आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून रेतीची अधिक दराने विक्री केली जात असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. त्यामुळे रेती घाटांच्या लिलावाचा मार्ग मोकळा करण्यासाठी राज्य पर्यावरण समितीने सर्व जिल्ह्यांकडून त्वरीत आॅनलाईन माहिती मागविली आहे.राज्यात रखडलेली रेती घाटांची लिलाव प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी नद्यांमधील वाळू घाटांत उपलब्ध वाळू साठा, रेती घाटांचे नकाशे व घाटांच्या खोलीबाबत विचारणा करीत यासंदर्भातील सविस्तर माहिती पाठविण्याचे निर्देश राज्य पर्यावरण समितीने राज्यातील सर्व जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना दिले आहे. राष्ट्रीय हरित लवादाच्या ११ डिसेंबर २०१८ च्या आदेशानुसार रेती घाटांसंदर्भात पर्यावरण विभागाने १५ जानेवारी २०१६ ला काढलेली अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील जिल्हास्तरीय पर्यावरण समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत.त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यात वाळू घाटांची लिलाव प्रक्रि या रखडली आहे. त्यानुषंगाने वाळू घाटांची लिलाव प्रक्रि या मार्गी लावण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील नद्यांमध्ये उपलब्ध रेती साठा, रेती साठ्याचे पुनर्भरण, रेती घाटांचे नकाशे व रेती घाटांची खोली यासंदर्भात विचारणा करीत या सर्व मुद्यांची माहिती दोन दिवसात आॅनलाइन सादर करण्याचे निर्देश राज्य पर्यावरण समितीने सर्व जिल्ह्यातील खनिकर्म अधिकाºयांना दिले आहे. जिल्हा प्रशासनाने अवैध रेती तस्करीला आळा घालण्यासाठी विविध उपाय योजना केल्याचा दावा केला असला तरी आजही पर्यावरणाचा नियमाला डावलून व घाट लिलाव झालेले नसतानाही खुलेआम रेतीचा उपसा केला जात आहे. गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्ह्यात मध्यप्रदेशातील रेती घाटाच्या रॉयल्टीवर महाराष्ट्रात रेतीची अवैधरित्या विक्र ी महसूल व पोलीस विभागाच्या डोळ्यात धूळफेक करुन केली जात आहे.या मुद्यांची मागविली माहितीरेती घाटांचे सर्व्हे नंबर, गट नंबर व रेती घाटांच्या भौगोलिक स्थानांचे अक्षांश-रेखांशासह रेती घाटांची माहिती. नदीतील पाणी वापराचे प्रमाण, वाळू घाटात पोहोचण्याचा मार्ग, पर्यावरण व्यवस्थापन व त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी. नदीचे नाव, उपलब्ध रेती साठा, रेती साठ्याचे पुनर्भरण, नकाशे, रेती साठ्याची खोली, रेती घाटांसंदर्भात आक्षेप असल्यास त्यासंदर्भात करण्यात आलेली कार्यवाही. रेती घाटांचा खाणकाम आराखडा व खाण बंद करण्याबाबतचा आराखडा. प्रस्तावित रेती घाटाच्या उत्खननामुळे सभोवतालच्या पर्यावरणावर होणारे परिणाम आदीची माहिती पर्यावरण समितीने मागविली आहे.

टॅग्स :sandवाळू