शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मुख्याध्यापकांच्या वेतन श्रेणीत निश्चित वाढ होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 6:00 AM

आ. चंद्रिकापूरे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी युपीएससी, एमपीएसी परीक्षांसारखे उपक्रम शालेय स्तरापासूनच राबविण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. सामाजिक, आर्थिक, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी व्यक्तीमत्त्वाचे जिवन चरित्र नोंदविलेले संदर्भ ग्रंथ विद्यार्थ्यांना वाचनाकरीता देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : मुख्याध्यापकांचे १९ वे शैक्षणिक संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : सहाव्या वेतन आयोगात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांना वेतन श्रेणी देतांना ती केंद्राप्रमाणे न दिल्यामुळे त्यांच्या अधिनस्थ कार्यरत उच्च माध्यमिक शिक्षक जास्त वेतन वेतनश्रेणीचा लाभ घेतात. मुख्याध्यापकांवरील हा अन्याय जर शासनास दूर करायचा असेल तर मुख्याध्यापक या पदाला उच्च वर्गीकृत करने अनिवार्य आहे. त्याशिवाय हे शक्य नाही असे प्रतिपादन आ. मनोहरराव चंद्रिकापूरे यांनी केले.जिल्हास्तरीय मुख्याध्यापकांच्या १९ व्या शैक्षणिक समेलंनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा संघाचे अध्यक्ष प्राचार्य रमेश तणवानी होते. स्वागताध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवा नेते रविकांत बोपचे होते. राज्य संघाचे अध्यक्ष मारोतराव खेडेकर, विदर्भ संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर, विदर्भ संघाचे कार्याध्यक्ष अशोक पारधी, उपाध्यक्ष विलास बारसागडे, शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेश रूद्रकार, गोरेगांव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी टी.बी.भेंडारकर, विदर्भ संघाचे उपाध्यक्ष रामसागर धावडे, विदर्भ महिला प्रतिनिधी रजिया बेग, जिल्हा संघाचे कार्याध्यक्ष दुर्गाप्रसाद पटले, विदर्भ प्रतिनिधी व माजी कार्यवाह महेंद्र मेश्राम, जिल्हा संघाचे मार्गदर्शक यशवंत परशुरामकर, जिल्हा संघाचे मार्गदर्शक प्रकाश पटेल, खुशाल कटरे, दिनेश रंहागडाले, नरेंद्र भरणे उपस्थित होते.आ. चंद्रिकापूरे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी युपीएससी, एमपीएसी परीक्षांसारखे उपक्रम शालेय स्तरापासूनच राबविण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. सामाजिक, आर्थिक, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी व्यक्तीमत्त्वाचे जिवन चरित्र नोंदविलेले संदर्भ ग्रंथ विद्यार्थ्यांना वाचनाकरीता देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मारोतराव खेडेकर म्हणाले, मुख्याध्यापकांच्या वेतन श्रेणीतील त्रुटी दूर करण्यासाठी मुख्याध्यापक संघांच्या वतीने बक्षी समितीकडे समक्ष पाठपुरावा केला. परिणामी बक्षी समितीने शासनाच्या शिक्षण व अर्थ विभागाकडे पाठपुरावा करुन मुख्याध्यापकांना श्रेणी देतांना झालेला अन्याय लक्षात आणून दिला. वेतन श्रेणीतील त्रृटी दूर करण्यासाठी शिफारस केली.महाराष्टÑ शासनाच्या अर्थमंत्रालयाच्या वतीने पाच सदस्यीय सचिव,उपसचिव यांची समिती गठीत केली. त्या समितीने मुख्याध्यापकांची वेतन श्रेणी संबंधातील मागणी रास्त असल्याचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे.शासन ज्यावेळी सातव्या वेतन आयोगाचा खंड दोन लागू करेल त्यावेळी हा विषय चर्चेसाठी येईल असे सांगितले. प्रास्ताविक जिल्हा संघाचे कार्यवाह बी.डब्ल्यू.कटरे यांनी मांडले. संचालन जिल्हासंघाचे उपाध्यक्ष प्राचार्य सी.जी.पाऊलझगडे, जिल्हा संघाचे प्राचार्य के.एस.वैद्य यांनी केले तर आभार तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह आर.वाय.कटरे यांनी मानले.संमेलनात ३० ठराव मंजूरसंमेलनाच्या प्रथम सत्रात, सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात, जिल्हा स्तरीय व शासन स्तरीय समस्या सोडविण्यासाठी एकूण ३० ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. पुढील वर्षीचे जिल्हास्तरीय मुख्याध्यापकांचे २० वे शैक्षणिक संमेलन तिरोडा येथे होईल याची घोषणा या वेळी करण्यात आली.