शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:23 IST

मानवी जीवनाचा सर्वागीण विकास हा त्याच्या शिक्षणावर अवलंबून असतो. शिक्षणाने संस्कार व मुल्यांची जडणघडण होते. माणसामध्ये जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासून मरणापर्यंत चाललेली शिकायची प्रक्रिया आहे.

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : आदिवासी जनजागृती मेळावा, विविध मान्यवरांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : मानवी जीवनाचा सर्वागीण विकास हा त्याच्या शिक्षणावर अवलंबून असतो. शिक्षणाने संस्कार व मुल्यांची जडणघडण होते. माणसामध्ये जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे शिक्षण होय. शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासून मरणापर्यंत चाललेली शिकायची प्रक्रिया आहे. एकविसाव्या शतकातही आपल्याला कायद्याचा बडगा उगारुन शिक्षणाचे महत्व सांगावे लागते ही खरी शोकांतिका आहे. शिक्षणाचे खरे महत्व समाजात रुजलेच नाही, यासाठी समाजच कारणीभूत असल्याचे प्रतिपादन मनोहर चंद्रीकापुरे यांनी केले.माहुरकुडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित आदिवासी जनजागृती मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत नाकाडे होते. उद्घाटन जि.प.सदस्य गिरीश पालीवाल यांनी केले.या वेळी मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रीकापुरे, बी.एस.सयाम, जि.प.सदस्य मंदा कुंभरे, चेतन उईके, कविता उईके, एस. आर. वाळवे, बाबुराव काटंगे, डॉ. नाजुक कुंभरे उपस्थित होते.चंद्रिकापुरे म्हणाले, ज्याप्रमाणे अनुसूचित जातीचे बांधव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून शिक्षणाला महत्व देतात त्याप्रमाणे आदिवासी बांधवानी जननायक बिरसा मुंडा यांना आदर्श मानून शैक्षणिक क्रांती केली पाहिजे. शिक्षण असेल तर त्याचा कुठेही उपयोग करुन घेता येतो. गरीबी वाट्याला येत नाही. आदिवासी बांधवानी उच्च शिक्षण घेऊन भारतीय संविधानाने दिलेल्या आरक्षणाचा लाभ घ्यावा, आपल्या न्याय हक्कासाठी लढा द्यावा व जीवन सुखकर करावे असे मत व्यक्त केले.बी.एस.सयाम म्हणाले, जल, जंगल व जमिनीवर पूर्वीच्या काळी आदिवासींचीच सत्ता होती. हे ऐश्वर्य व आदिवासींचे हक्क अबाधित राखण्यासाठी बिरसा मुंडा यांनी लढा दिला. मात्र वर्तमान स्थितीत आदिवासींना जंगलातही राहता येत नाही व शहरातही वास्तव्य करता येत नाही अशी बिकट अवस्था आदिवासींची झाली आहे. जंगलाचा मालक असूनही आदिवासींनी कधीच त्याचा वापर केला नाही.आदिवासी समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे हक्क व अधिकारांची जाणीव नाही. अपूरे शिक्षण हे त्यांच्या दारिद्रयाचे मूळ आहे. त्यामुळे व्यसनाधिनतेचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी सांगीतले.याप्रसंगी भागवत नाकाडे, गिरीश पालीवाल यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सुनिता कोकोडे यांनी केले तर आभार नेतराम मलगाम यांनी मानले.

टॅग्स :Educationशिक्षण