शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांना सुरक्षित छत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:13 IST

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद शाळेच्या ३८८ इमारती जीर्ण झाल्या असल्याची बाब उघडकीस आली होती. त्यानंतर अंगणवाडीतील चिमुकले सुद्धा सुरक्षित नसून तब्बल ३१५ अंगणवाड्यांच्या इमारती जीर्ण झाल्या असून त्याच जीर्ण इमारतीत हे चिमुकले बसत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्दे३१५ अंगणवाड्यांच्या इमारती जीर्ण : प्रशासनाची डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद शाळेच्या ३८८ इमारती जीर्ण झाल्या असल्याची बाब उघडकीस आली होती. त्यानंतर अंगणवाडीतील चिमुकले सुद्धा सुरक्षित नसून तब्बल ३१५ अंगणवाड्यांच्या इमारती जीर्ण झाल्या असून त्याच जीर्ण इमारतीत हे चिमुकले बसत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.बालकांना सुदृढ आरोग्य सेवा देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाची गोडी लागावी. यासाठी बालपणापासूनच अंगणवाडीत दाखल केले जाते. परंतु बालमनावर संस्कार टाकणाऱ्या ह्या अंगणवाड्या चिमुकल्यांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार हे वास्तव पुढे आले आहे.जिल्ह्यातील ३१३ अंगणवाड्यांची इमारती जीर्णावस्थेत आहेत. यात आदिवासी दुर्गम क्षेत्रातील १०५ तर बिगर आदिवासी क्षेत्रातील २०८, दलित वस्तीतील ११६ अंगणवाड्यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील १ हजार ५४७ अंगणवाड्या व १३२ मिनी अंगणवाड्या आहेत. यात ३६ अंगणवाड्यांसाठी इमारती नाहीत. आठ अंगणवाड्यांसाठी निधी मिळाला आहे. याव्यतिरीक्त २८ अंगणवाड्या इमारतीविना आहेत. तर ३१३ अंगणवाड्याच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. यात आदिवासी दुर्गम भाग (टीएसपी) च्या १०५ तर इतर आदिवासी क्षेत्र (ओटीएसपी) च्या २०८ अंगणवाड्यांचा समावेश आहे. आदिवासी दुर्गम क्षेत्रात ५० टक्के आदिवासी आहेत. इतर आदिवसाी क्षेत्रात ५० टक्के आदिवासी समाज आहे. दलित वस्तीत असणाºया ११६ अंगणवाड्यांच्या इमारतींची अवस्था जीर्ण झाली आहे.या अंगणवाडीत शिक्षण घेणाºया बालकांना धोका पत्थकारुन शिक्षणाचे धडे दिले जाते. अंगणवाड्यांची स्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे कोणत्या अंगणवाडीत बालकांना ठेवता येईल. कोणत्या ठिकाणी ठेवता येणार नाही.यासंदर्भात जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाने जि.प. च्या कार्यकारी अभियंता यांना पडताळणी करण्याचे पत्र दिले. या पडताळणीनंतर कोणत्या अंगणवाड्याच्या इमारती अखरेच्या घटका मोजत आहे.