शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीव्र भूकंपाची शक्यता नाहीच

By admin | Updated: July 25, 2015 01:32 IST

अवघ्या ३ सेकंदाच्या धरणीकंपाने हादरून गेलेल्या जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी गुरूवारची रात्र मोठ्या भितीयुक्त वातावरणात काढली.

भूगर्भतज्ज्ञांचा निर्वाळा : दहशतीखालील नागरिकांनी सोडला सुटकेचा नि:श्वासगोंदिया : अवघ्या ३ सेकंदाच्या धरणीकंपाने हादरून गेलेल्या जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी गुरूवारची रात्र मोठ्या भितीयुक्त वातावरणात काढली. शुक्रवारी दिवसभरही सर्वत्र भूकंपाचीच चर्चा होती. मात्र २४ तासात पुन्हा भूकंपाचा कोणताही धक्का अनुभवायला न मिळाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान जिल्ह्यातील भूगर्भात असलेल्या दगडांचा थर पाहता तीव्र स्वरूपाच्या आणि नुकसानकारक अशा भूकंपाची शक्यता जिल्ह्यात नसल्याचा निर्वाळा भूगर्भतज्ज्ञांनी दिला आहे.गेल्या अनेक वर्षात गोंदिया जिल्हावासीयांनी भूकंपाचा धक्का अनुभवला नाही. यापूर्वी जे काही धक्के बसले असतील त्याची तीव्रता कमी असल्यामुळे अनेकांना ते धक्के जाणवलेही नव्हते. मात्र गुरूवारच्या रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी जाणवलेला धक्का सर्वांनीच अनुभवला. आभाळ गडगडल्यासारखा आवाज करीत जमिनीला ३ सेकंदपर्यंत हादरे बसल्याने तळमजल्यासह उंच इमारतीत राहणाऱ्यांनाही भुकंपाच्या धक्क्यांचा अनुभव घेता आला. हा भूकंप रिस्टर स्केलवर ३.९ एवढ्या तीव्रतेचा होता. याचा केंद्रबिंदू जमिनीखाली १० किलोमीटर खोलवर होता. (जिल्हा प्रतिनिधी)भूकंपानंतर देवरी रुग्णालयातून १५ रुग्ण पसारदेवरी : गुरूवारी रात्री आलेल्या भूकंपानंतर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती असलेले १५ रुग्ण रुग्णालयातून पसार झाले. काहींनी तेव्हाच काढता पाय घेतला तर काहींनी आपण स्वत:च्या जबाबदारीवर जात असल्याचे लिहून देत रुग्णालय सोडणे पसंत केले. त्यामुळे शुक्रवारी या रुग्णालयात एकही रुग्ण भरती नसल्याचे चित्र दिसत होते.देवरीतील ग्रामीण रुग्णालयात विविध आजारांनी ग्रस्त असलेले १५ रुग्ण भरती होते. त्यात काही पुरूष व काही महिला होत्या. भूकंपाच्या धक्क्यात त्यांनी रुग्णालयाची दारे, खिडके हलल्याचे पाहिले. त्यातच रात्री पुन्हा भूकंप येण्याची वार्ता पसरल्याने ते आणखीच घाबरले. रुग्णालयाचे इमारत जीर्ण असल्याने रुग्णांमध्ये घबराट पसरली व त्यांनी तेथून निघून जाणेच पसंत केले.गेल्या ४० वर्षापूर्वी बांधलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत पावसाचे पाणी गळते. ठिकठिकाणी भिंतींना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रुग्णच नाही तर डॉक्टरांना सुद्धा या ठिकाणी काम करताना भिती वाटते. या इमारतीचे नव्याने बांधकाम करण्यासाठी कळविल्यानंतरही बांधकाम विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.मध्य भारतासह विदर्भातील भूगर्भात टणक दगड आहेत. याभागात तीव्र स्वरूपाच्या भूकंपाची शक्यता नसते. जमिनीत खूप खोलवर मोठ्या प्रमाणात पाणी मुरून जमिनीचा स्तर खचला तरच भूकंप येतो. पण तशी परिस्थिती या भागात नाही. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.- प्रा.सुरेश चोपणे, भूगर्भतज्ज्ञ, चंद्रपूर‘ती’ अफवाच ठरलीरात्री ८ वाजून ५ मिनिटांनी बसलेल्या भुकंपाच्या धक्क्यानंतर पुन्हा रात्री १२ ते १ च्या सुमारास तीव्र स्वरूपाचा भुकंपाचा धक्का बसणार असल्याचा संदेश मोबाईलवरून सर्वत्र फिरत होता. या संदेशाची खात्री करण्यासाठी ‘लोकमत’कडेही शेकडो लोकांनी विचारणा केली. मात्र जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी त्या शक्यतेबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे स्पष्ट करीत कोणीही घाबरून न जाण्याचे आवाहन केल्यानंतर अनेकांचा जीव भांड्यात पडला. मात्र तरीही बहुतांश नागरिकांचा भितीमुळे डोळ्याला डोळा लागला नाही. सकाळी सर्वकाही ठिक असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांना हायसे वाटले.विदर्भात मोठा भूकंप नाहीभारतात दोन प्रकारे भूकंप होतो. एका प्रकारात भारतीय भूखंडाची प्लेट युरेशियन प्लेटला टक्कर देते. त्या भूकंपाची तीव्रता जास्त असते. मात्र मध्य भारतात आणि विदर्भातील भूकंप दुसऱ्या प्रकारात मोडतात. दख्खनच्या पठारातील खडकांच्या या प्रदेशात भूकंपाची तीव्रता कमी असते.विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचाजवळ ४.५ रिस्टर स्केल तिव्रतेचा भूकंप झाला होता. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यात वणीजवळ तसेच नागपूर जिल्ह्यात भुकंप झाले आहेत. मात्र त्याची तीव्रता कमी होती.