लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना रू ग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच सिव्हील लाईन्स परिसरात रूग्ण वाढल्याने आता येथे २ कंटेन्मेंट झोन झाले आहेत.कोरोनाच्या सुरूवातीलाच २७ मार्च रोजी कोरोनाचा एक रूग्ण शहरात आढळला होता. त्यानंतर मात्र गोंदिया शहर सुरक्षित होते. पण मागील महिन्यात कुंभारेनगरात कोरोनाचा उद्रेक झाला. शहरात कोरोनाने पुन्हा प्रवेश केला. शहरातील कुंभारेनगर कोरोनाचे हॉट स्पॉट बनत असतानाच त्यानंतर गोविंदपूर परिसरातही कोरोना रूग्ण आढळÞून आला होता. एवढेच नव्हे तर आता शहरातील मुख्य भाग समजल्या जाणाऱ्या सिव्हील लाईन्स परिसरातही कोरोनाचा शिरकाव झाला.हैदराबाद येथून आले ३ रूग्ण आढळल्याने सिव्हील लाईन्स हनुमान चौक सध्या कंटेन्मेंट झोनमध्ये आला आहे. त्यानंतर आता येथून थोडे पुढे गेल्यावर इंजिनशेड शाळा परिसरात बिलासपूर येथून आलेली एक व्यक्ती बाधित आढळून आली आहे.यामुळे सिव्हील लाईन्समधील आता हे दुसरे कंटेन्मेंट झोन झाले आहे.सिव्हील लाईन्स परिसर दाट लोकवस्ती व रात्रंदिवस वर्दळीचा हा भाग आहे. अशात आता येथे कोरोनाचा शिरकाव झाल्याने सिव्हील लाईन्सवासी दहशतीत वावरत आहेत. सध्या या दोन्ही भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून बाहेरील व्यक्तींचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. शासनाकडून करण्यात येणाऱ्या सर्वच उपाययोजन केल्या जात आहेत.उपाययोजनांच्या अंंमलबजावणीची गरजशासनाकडून नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर तसेच अत्यंत महत्त्वाचे काम असल्यास घरातून बाहेर निघण्याबाबत सांगितले जात आहे. मात्र नागरिक या सर्व उपाययोजनंकडे दुर्लक्ष करीत आपल्या मर्जीने वावरताना दिसत आहे. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे झाले आहे. यासाठी आता सिव्हील लाईन्सवासीयांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.
सिव्हील लाईन्स परिसरात आता दोन कंटेन्मेंट झोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST