शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...तर १७ हजार मतदारांची नावे होणार यादीतून कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 05:00 IST

भारत निवडणूक आयोगाचे २४ ऑगस्ट २०२० च्या पत्रानुसार १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला. १५ जानेवारी २०२१ रोजी जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आणि आमगाव या चारही विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

ठळक मुद्दे५ जुलैपर्यंत करावे लागणार छायाचित्र जमा : मतदार यादीत छायाचित्र असणे अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  निवडणूक आयाेगाने मतदार याद्यांमध्ये मतदारांचे छायाचित्र असणे अनिवार्य केले होते. यांतरगंत मतदार यादीत छायाचित्र नसलेल्यांची यादी तयार करून मतदारांना छायाचित्र संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ वगळता तिन्ही मतदारसंघांतील १७१९१ मतदारांनी अद्यापही छायाचित्र निवडणूक विभागाकडे जमा केलेले नाही. त्यामुळे यांची नावे मतदार यादीतून कमी होण्याची शक्यता आहे. भारत निवडणूक आयोगाचे २४ ऑगस्ट २०२० च्या पत्रानुसार १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला. १५ जानेवारी २०२१ रोजी जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आणि आमगाव या चारही विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १७१९१ छायाचित्र नसलेले मतदार असून अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघांमधील छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र गोळा करण्याचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी मतदार यादीतील सर्व नावासमोर संबंधित मतदाराचे छायाचित्र असणे अनिवार्य असल्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार छायाचित्र नसलेले मतदारांचे छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मार्फत गोळा करून मतदार यादीत अद्ययावत करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची छायाचित्र नसलेल्यांमध्ये तिरोडा मतदारसंघातील १६७२, गोंदिया विधानसभा मतदारसंघातील १४९४६, आमगाव मतदारसंघातील ५७३ अशा एकूण १७१९१ मतदारांची छायाचित्रे अद्यापही निवडणूक विभागाला प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघांतील मतदारांनी मतदार यादीत आपले छायाचित्र आहे अथवा नाही याची खात्री करून घ्यावी.  

तहसील कार्यालयात जाऊन करा खात्री मतदार यादीची तपासणी करून आपल्या नावासोबत छायाचित्र आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. मतदार यादीत नावासोबत छायाचित्र नसल्यास त्वरित संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयात ५ जुलैपर्यंत सादर करावे, अन्यथा अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले यांनी कळविले आहे. 

 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग