शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

...तर १७ हजार मतदारांची नावे होणार कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

गोंदिया : निवडणूक आयाेगाने मतदार याद्यांमध्ये मतदारांचे छायाचित्र असणे अनिवार्य केले होते. यांतरगंत मतदार यादीत छायाचित्र नसलेल्यांची यादी ...

गोंदिया : निवडणूक आयाेगाने मतदार याद्यांमध्ये मतदारांचे छायाचित्र असणे अनिवार्य केले होते. यांतरगंत मतदार यादीत छायाचित्र नसलेल्यांची यादी तयार करून मतदारांना छायाचित्र संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ वगळता तिन्ही मतदारसंघांतील १७१९१ मतदारांनी अद्यापही छायाचित्र निवडणूक विभागाकडे जमा केलेले नाही. त्यामुळे यांची नावे मतदार यादीतून कमी होण्याची शक्यता आहे.

भारत निवडणूक आयोगाचे २४ ऑगस्ट २०२० च्या पत्रानुसार १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला. १५ जानेवारी २०२१ रोजी जिल्ह्यातील अंतिम मतदार यादी अर्जुनी मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आणि आमगाव या चारही विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १७१९१ छायाचित्र नसलेले मतदार असून अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघांमधील छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र गोळा करण्याचे काम १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी मतदार यादीतील सर्व नावासमोर संबंधित मतदाराचे छायाचित्र असणे अनिवार्य असल्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार छायाचित्र नसलेले मतदारांचे छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मार्फत गोळा करून मतदार यादीत अद्ययावत करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची छायाचित्र नसलेल्यांमध्ये तिरोडा मतदारसंघातील १६७२, गोंदिया विधानसभा मतदारसंघातील १४९४६, आमगाव मतदारसंघातील ५७३ अशा एकूण १७१९१ मतदारांची छायाचित्रे अद्यापही निवडणूक विभागाला प्राप्त झालेली नाहीत. त्यामुळे या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे या तिन्ही मतदारसंघांतील मतदारांनी मतदार यादीत आपले छायाचित्र आहे अथवा नाही याची खात्री करून घ्यावी.

.........

तहसील कार्यालयात जाऊन करा खात्री

मतदार यादीची तपासणी करून आपल्या नावासोबत छायाचित्र आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. मतदार यादीत नावासोबत छायाचित्र नसल्यास त्वरित संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयात ५ जुलैपर्यंत सादर करावे, अन्यथा अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले यांनी कळविले आहे.

..........