शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाकोटीची पाणीपुरवठा योजना ठरली फाेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2022 05:00 IST

पालांदूर जमी हे गाव तालुक्यातील अतिदुर्गम गाव आहे. गावात सात ते आठ बोअरवेल आणि दोन-तीन विहिरी आहेत; पण यानंतरही येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जल जीवन मिशन योजना पालांदूर गावला मंजूर झाली; पण संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी या योजनेत जुन्याच पाइपलाइनला या योजनेची पाइपलाइन जोडली. या गावालगत असलेल्या चूलबंद नदीत निकृष्ट दर्जाची विहीर बांधल्याने गावकऱ्यांना आता पाणीटंचाईला  तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलोहारा : १ कोटी दहा लक्ष रुपयांचा निधी खर्चून जल जीवन मिशन ही योजना देवरी तालुक्यातील नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल ग्रामपंचायत पालांदूर जमी येथे मंजूर करण्यात आली. कंत्राटदार आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्षित  धोरणामुळे गावकऱ्यांना या योजनेनंतरही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पालांदूर जमी हे गाव तालुक्यातील अतिदुर्गम गाव आहे. गावात सात ते आठ बोअरवेल आणि दोन-तीन विहिरी आहेत; पण यानंतरही येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जल जीवन मिशन योजना पालांदूर गावला मंजूर झाली; पण संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी या योजनेत जुन्याच पाइपलाइनला या योजनेची पाइपलाइन जोडली. या गावालगत असलेल्या चूलबंद नदीत निकृष्ट दर्जाची विहीर बांधल्याने गावकऱ्यांना आता पाणीटंचाईला  तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

अनामत रक्कम केली परत- ग्रामपंचायत पालांदूर जमीअंतर्गत १ कोटी १० लक्ष रुपये निधीची जल जीवन मिशन योजना कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेंतर्गत हर घर नल, हर घर जल या उद्दिड्टाची पूर्तता करण्यात आली; परंतु संबंधित कंत्राटदाराने व ग्रामपंचायतीने या योजनेची योग्य अंमलबजावणी न केल्याने ही योजना निष्फळ ठरली. मात्र, ग्रामविकास अधिकाऱ्याने  योजना सुरू असल्याचे दाखवून कंत्राटदाराची जमा असलेली १० लाख रुपयांची अनामत रक्कम परत केल्याची माहिती आहे. 

 गावकऱ्यांची केली दिशाभूल - या योजनेंतर्गत गावातीलच नळजोडणीधारकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचलेच नाही. मात्र, ही योजना सुरळीत सुरू असल्याचे कागदोपत्री दाखवून गावकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कंत्राटदाराने केलेल्या बोगस कामाची मौका तपासणी करून गावकऱ्यांना त्वरित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.वर्षभरापासून योजना ठप्प - पालांदूर जमी येथील ग्रामपंचायतने पाचशे रुपये द्या नळ कनेक्शन देतो असे सांगत गावातील अनेक नागरिकांच्या घरी नळजोडणी केली. जल जीवन मिशन योजनेच्या नावाखाली केवळ दोन दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा करण्यात आला. त्यानंतर नळ योजना बंद पडली. 

गावात एक कोटी दहा लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. नदीवर बांधलेली विहीर बांधकाम करतानाच फुटली. त्याची दुरुस्ती करून नळ योजना सुरू झाल्याचे सांगितले. कंत्राटदार आणि ग्रामसेवकाने मिलीभगत करून  गावकऱ्यांची दिशाभूल केली. - द्वारकाप्रसाद गुप्ता, गावकरी कंत्राटदार आणि ग्रामपंचायतच्या दुलर्क्षित धोरणामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.  त्यामुळे या योजनेची चौकशी करून दाेषींवर कारवाई करण्यात यावी. -यशवंत गुरुनुले, गावकरी

 

टॅग्स :Waterपाणी