शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

घराची भिंत कोसळून आई-वडील व मुलगी गंभीर जखमी, उपचार सुरू

By अंकुश गुंडावार | Updated: September 7, 2022 09:45 IST

बावणकर यांच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे त्यांना शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

गोंदिया - सर्व कुटुंबीय गाढ झोपेत असतानाच घराची भिंत कोसळल्याने त्याखाली दबून आई-वडील व मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री २ वाजताच्या सुमारास तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथे घडली. रामजी गंगाराम बावणकर (५५), श्यामकला रामजी बावणकर( ५०), सुरुची रामजी बावणकर (१९) असे गंभीर जखमी असलेल्यांची नाव आहे. तर  निखिल रामजी बावनकर (२३) असे किरकोळ जखमी असलेल्या मुलाचे नाव आहे. जखमींना गावकऱ्यांनी त्वरित गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. प्राप्त माहितीनुसार मंगळवारी (दि.६) रात्री जेवण करुन सर्व बावणकर कुटुंब झोपी गेले. 

गाढ झोपेत असतानाच रात्री २ वाजताच्या सुमारास त्यांच्या घराची भिंत कोसळली. यात रामजी गंगाराम बावणकर (५५), श्यामकला रामजी बावणकर( ५०), सुरुची रामजी बावणकर (१९) हे दबल्याने गंभीर जखमी झाले. तर निखिल रामजी बावनकर हा किरकोळ जखमी झाला. दरम्यान मुलाने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावून आले. त्यांनी भिंतीखाली दबलेल्या बावणकर कुटुंबीयांना बाहेर काढून त्वरित रुग्णालयात दाखल करण्यासाठी गोंदिया येथे नेले. सध्या त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. बावणकर यांच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे त्यांना शासनाने आर्थिक मदत करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

मुलीचा होता आज पेपर

रामजी बावणकर यांची मुलगी सुरुची ही बी.ए.प्रथम वर्षाला शिकत असून आज तिचा पेपर होता. परंतु ती गंभीर जखमी असल्याने तिला परीक्षेपासून वंचित रहावे लागणार आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया