शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील स्वातंत्र्य दिन सोहळ्याला भजेपारचे सरपंच विशेष अतिथी!

By अंकुश गुंडावार | Updated: August 1, 2025 15:18 IST

स्मार्ट ग्रामच्या कार्याची घेतली दखल : जिल्ह्याचा गौरव

सालेकसा : दिल्लीतील लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय परेड सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी तालुक्यातील भजेपार स्मार्ट ग्रामपंचायतीचे उपक्रमशील सरपंच तथा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार यांना निमंत्रण मिळाले आहे. ते सहकुटुंब या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील १५ सरपंचांना दिल्ली येथील लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित सोहळ्यासाठी मानाच्या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकुमार बहेकार यांचा समावेश आहे. त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण जिल्ह्याचा आणि सालेकसा तालुक्याच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या विशेष निमंत्रणाचे श्रेय सरपंच बहेकार यांनी भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायतराज विभाग, गोंदिया जिल्हा परिषद, पंचायत समिती, सालेकसा प्रशासन आणि सेवेची संधी देणाऱ्या ग्रामपंचायत भजेपार येथील ग्रामस्थांंना दिले आहे.

अडीच वर्षात १ कोटी १० लाखांचे पुरस्कार

भजेपार ग्रामपंचायतीला मागील अडीच वर्षांत माझी वसुंधरा अभियान राज्यस्तरीय पुरस्कार ५० लाख रुपये, जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कार ५० लाख रुपये, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय तिसरे पुरस्कार (वर्ष २०२२-२३) ३.६० लाख रुपये, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार (वर्ष २०२४- २५) ६.६० लाख रुपये असे एकंदरीत १.१० कोटी रुपयांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

ग्रामपंचायतीच्या या उपक्रमांची दखलभजेपार ग्रामपंचायतीतर्फे राबविण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक, नाविन्यपूर्ण आणि सेवाभावी उपक्रमांची दखल घेऊन सरपंच बहेकार यांना सन्मानाची संधी मिळाली आहे. ग्रामपंचायत भजेपारअंतर्गत येणाऱ्या आरोग्य उपकेंद्रास सुंदर माझा दवाखाना, कायाकल्प आणि टीबीमुक्त पंचायत पुरस्कार प्राप्त झाला आहे. याव्यतिरिक्त सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक लोकोपयोगी उपक्रमांमुळे आणि विशेषतः भजेपार चषक आंतरराज्यीय महिला - पुरुष कबड्डी स्पर्धेमुळे या गावाची एक वेगळी ओळख जिल्ह्यासह राज्यात निर्माण झाली आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाIndependence Dayस्वातंत्र्य दिनdelhiदिल्ली