शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांनी केला सात लाखांचा माल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 05:00 IST

डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक-१७, प्रगती कॉलनी, आर. के. पेट्रोल पंपासमोर सोमवारी (दि. ४) मध्यरात्री १ ते ३.३० च्या दरम्यान आरोपींनी मनीष गुरूप्रसाद गुप्ता (वय ५२, रा. प्रगती कॉलनी) यांच्या पत्नी व मुलीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल तसेच बेडरूममधील लाकडी आलमारीतील रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल  असा ३ लाख ८४ हजार रुपयांचा माल चोरून नेला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सडक-अर्जुनी शहरात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे. एकाच रात्रीत दोन घरफोड्या व एका ठिकाणी दरोडा घालून सात लाख सात हजार रुपयांचा माल पळवून नेला आहे. लोखंडी रॉडचा धाक दाखवून त्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लुटून नेली. या कृत्यात सात आरोपींचा समावेश आहे. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक-१७, प्रगती कॉलनी, आर. के. पेट्रोल पंपासमोर सोमवारी (दि. ४) मध्यरात्री १ ते ३.३० च्या दरम्यान आरोपींनी मनीष गुरूप्रसाद गुप्ता (वय ५२, रा. प्रगती कॉलनी) यांच्या पत्नी व मुलीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल तसेच बेडरूममधील लाकडी आलमारीतील रोख रक्कम, सोन्याचे दागिने व मोबाईल  असा ३ लाख ८४ हजार रुपयांचा माल चोरून नेला. तेथीलच पुष्पकला पुरषोत्तम बोरकर (५६) यांच्या घरासमोरील दाराचे कुलूप तोडून दोन लाख १४ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला. त्यांच्या घरासमोरील धनराज शंकर डहारे (३८) यांच्या घरासमोरील दाराचे इंटरलॉक तोडून एक लाख आठ हजार ५०० रुपयांचा माल असा एकूण सात लाख सात हजार रुपयांचा माल चोरून नेला. यासंदर्भात सातजणांवर डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम ३९५, ४५७, ३८०, ४२७ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तपास पोलीस निरीक्षक सचिन वांगळे करीत आहेत.

नागपूरवरून परतताच सातजणांनी लुटले -  सोमवारी रात्री १२.३० वाजतादरम्यान मनीष गुप्ता हे परिवारासह नागपूर येथून घरी परतले असता, दोनजण  हातात रॉड घेऊन त्यांच्या घरासमोरील पोर्चमध्ये दिसले. गुप्ता यांनी कोण आहात, असे विचारल्यावर त्याचवेळी त्यांच्या घरातून आणखी पाचजण बाहेर आले. त्या सातजणांनी लोखंडी रॉडने त्यांच्या गाडीच्या काचा फोडून गाडीचे नुकसान केले. तसेच गाडीत बसलेल्या त्यांच्या पत्नी व मुलीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. डुग्गीपार पोलीस सुस्त; चोर चुस्त...- सडक-अर्जुनी शहरात डुग्गीपार पोलिसांची गस्त होत नसल्याने याचा फायदा दरोडेखोरांनी घेतला. डुग्गीपार पोलीस सुस्त असल्याने दरोडेखोरांनी एकाच रात्री सात लाखांहून अधिक रुपयांची मालमत्ता लुटून नेली. कुणी कॉल केला, तरी पोलीस ठाण्याचा क्रमांक कुणी उचलत नाही. ठाणेदारांना, वरिष्ठांना खूश करण्यासाठीच वेळ कमी पडतो, यात गस्त कोण घालणार? असा सवाल नागरिक करीत आहे. सडक-अर्जुनी येथे झालेल्या एका रात्रीत तीन चोरीच्या घटनांमुळे नागरिक धास्तावलेले असून, ठाणेदारांची बदली करण्याची मागणी होत आहे.

 

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी