शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी वाढले मात्र बसेस मोजक्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:00 IST

कामावर असलेले कर्मचारी व काही कंत्राटी चालक-वाहक घेऊन बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र कर्मचारी कमी असल्याने मोजक्याच व काही निर्धारित मार्गांवरच फेऱ्या सुरू आहेत. मात्र फेऱ्या सुरू झाल्याने आता प्रवासी बस स्थानकाची धाव घेत असून फेऱ्या मोजक्याच असल्याने त्यांची पंचाईत होत आहे. अशात आता प्रवासी बसफेऱ्या वाढविण्याची मागणी करीत आहेत. 

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  कर्मचारी आपले आंदोलन मागे घेण्यासाठी राजी नसून अशात आता महामंडळाने आहे त्या कर्मचाऱ्यांचा वापर करून तसेच कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी घेऊन बसफेऱ्या सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा आगारानेही कामावर असलेले कर्मचारी व काही कंत्राटी चालक-वाहक घेऊन बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र कर्मचारी कमी असल्याने मोजक्याच व काही निर्धारित मार्गांवरच फेऱ्या सुरू आहेत. मात्र फेऱ्या सुरू झाल्याने आता प्रवासी बस स्थानकाची धाव घेत असून फेऱ्या मोजक्याच असल्याने त्यांची पंचाईत होत आहे. अशात आता प्रवासी बसफेऱ्या वाढविण्याची मागणी करीत आहेत. 

गोंदिया स्थानकावरून या मार्गावर धावताहेत बसेस गोंदिया स्थानकातून सध्या गोंदिया ते नागपूर (तुमसर मार्गे) तसेच गोंदिया ते नागपूर (कोहमारा मार्गे) बसेस धावत आहेत. त्याचप्रकारे, तिरोडा आगारातून तिरोडा-गोंदिया तसेच तिरोडा-तुमसर-भंडारा अशा बसेस धावत आहेत. 

प्रवाशांचा वैताग 

सुमारे ३ महिन्यांनंतर आता कोठे एसटी रस्त्यावर उतरली आहे. मात्र त्यातही काही मोजक्याच फेऱ्या सुरू असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा काहीच फायदा मिळत नाही. संपूर्ण फेऱ्या सुरू होणार तेव्हाच सर्वसामान्य प्रवाशांची सोय होणार. - राजेश देशमुख

आगारांनी बस फेऱ्या सुरू केल्या आहेत. मात्र मोजक्याच फेऱ्या सुरू असून त्याही मुख्य मार्गावरील आहेत. अशात मात्र त्याव्यतिरीक्त अन्य मार्गांवर फेऱ्या सुरू न झाल्याने त्या भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. आगाराने संपूर्ण फेऱ्या सुरू केल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही. - संजू टेकाम

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप