शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पारा कोसळला; गोंदियामध्ये थंडी भलतीच वाढली, पारा ९ अंशांवर

By कपिल केकत | Updated: December 19, 2023 20:51 IST

गार वारे सुटले, नोंदवलं गेलं यंदाचं सर्वात कमी तापमान

कपिल केकत, गोंदिया: मागील आठवडाभरापासून थंडीचा जोर वाढतच चालल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, आता दिवसा ऊन व सायंकाळी थंडी हा प्रकार थांबला असून, दिवसभर गार वारे सुटल्यामुळे गरम कपड्यांशिवाय वावरणे कठीण होत आहे. त्यातही मंगळवारी (दि. १९) पारा चांगलाच कोसळला असून, किमान तापमानाची ९ अंशांवर नोंद घेण्यात आली.

यंदाचे हे सर्वात कमी तापमान ठरले असून, गोंदिया व यवतमाळ जिल्हा विदर्भात पहिल्या क्रमांकावर होते.डिसेंबर महिना लागूनही पाहिजे तशी थंडी पडली नसल्याने हिवाळ्याचा काही अंदाज जिल्हावासीयांना येत नव्हता. सकाळी व सायंकाळी थंडीचा जोर वाढत होता; मात्र दिवसा उन्हामुळे पाहिजे तसा हिवाळा जाणवत नव्हता. मात्र, मागील आठवडाभरापासून थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसला. आठवड्याभरापासून पारा १२ ते १३ अंशांदरम्यान वरखाली होत होता. मात्र, मंगळवारी (दि. १९) पारा चांगलाच घसरला असून, किमान तापमान थेट ९ अंशांवर आले होते. यंदाचे हे सर्वात कमी तापमान ठरले. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील मागील एक-दोन दिवसांपासून गारे सुटले असून, त्यामुळेही जिल्हावासीयांना हुडहुडी भरू लागली आहे. मंगळवारी गोंदिया व यवतमाळ जिल्हा विदर्भात पहिल्या क्रमांकावर होता.

रात्री लवकरच शुकशुकाट

थंडीचा जोर वाढू लागल्यामुळे रात्रीला आता फिरणाऱ्यांची गर्दी कमी झाल्याचे दिसत आहे. नागरिक आपली कामे आटोपून आता लवकरच घरात शिरत असल्यामुळे रात्रीला लवकरच रस्त्यांवर शुकशुकाट होत आहे. त्यातही जे बाहेर दिसतात ते शेकोटीच्या अवतीभवती घोळका करून असतात. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात थंडी जास्त जाणवत असल्याने आता शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

प्रथम पाच शहरांचे तापमान

शहर- किमान तापमान

  • गोंदिया व यवतमाळ- ९
  • नागपूर- ९.४
  • वाशिम -१०
  • गडचिरोली- १०.६
  • चंद्रपूर- ११
टॅग्स :gondiya-acगोंदिया