शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चिंगी जंगलात उपकरण सापडले

By अंकुश गुंडावार | Updated: May 14, 2024 16:32 IST

परिसरात खळबळ:हे उपकरण हवामान विभागाचे असल्याचा प्राथमिक निष्कर्ष

लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी मोरगाव : नवेगाव बांध वनपरिक्षेत्रांतर्गत चिंगी बीट क्रमांक एक मधील कक्ष क्रमांक २१३ मध्ये शुक्रवारी (१०) एक इलेक्ट्रॉनिक्स उपकरण आढळून आले. या उपकरणामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे उपकरण हवामान खात्याचे असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आल्यानंतर जनतेच्या मनातली भीती दूर झाली आहे.

हवामानाचा अंदाज व वातावरणाचे निरीक्षण करणारे उपकरण हवामान विभागाद्वारे आकाशात सोडले जातात. वातावरणातील परिस्थितीचा अंदाज वर्तविण्याकरिता हे उपकरण सोडले जात असल्याचे समजते. यावरून हवामानाचा अंदाज निश्चित केला जातो. चिंगी बीटात वनरक्षक दुलिचंद सूर्यवंशी हे जंगलाची पाहणी करत असताना त्यांना अज्ञात वस्तू पडलेली दिसली. त्यांनी लगेच याची माहिती वन विभागाला दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. त्यांना हे उपकरण हवामान विभागाचे असल्याचे लक्षात आले. पंचक्रोशीत ही बातमी पसरतात एकच खळबळ माजली. वन विभागाने हे उपकरण आपल्या ताब्यात घेतले आहे.  

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वातावरणातील हवामानाचा अंदाज घेतला जातो. वातावरणाची परिस्थिती अशा उपकरणांद्वारे संकलित करून ती हवामान विभाग मार्फत लोकांपर्यंत पोहोचवली जाते. त्यासाठी अवकाशात सोडलेले असले उपकरण हे महत्त्वाची भूमिका बजावतात. चिंगी येथे सापडलेल्या या उपकरणावर वेदर WxR 301D असे लिहिले असून हे  हवामान खात्याशी संबंधित असल्याचे समजते.

उपकरण सापडले असल्याची खातरजमा प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी अवगान यांनी दिली. यासंदर्भात गुगलवर सर्च केले त्यात काही बातम्या मिळाल्या.महाराष्ट्रात सातारा व जम्मू काश्मीर च्या भागात सुद्धा अशी उपकरणे सापडल्याची बातमी आहे. जनतेने घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया