शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

वन विभागाच्या जागेवर मांडले ठाण

By admin | Updated: January 30, 2016 02:12 IST

श्री माँझी आंतरराष्ट्रीय समाजवाद आदिवासी किसान सैनिकांना भारतात कुठेही बैठक व कार्यक्रम घेण्याकरिता जागा उपलब्ध नाही.

बैठकी वृक्षाखाली : माँझी आदिवासी सैनिकांच्या जागेच्या मागणीकडे दुर्लक्षदेवरी : श्री माँझी आंतरराष्ट्रीय समाजवाद आदिवासी किसान सैनिकांना भारतात कुठेही बैठक व कार्यक्रम घेण्याकरिता जागा उपलब्ध नाही. अनेकदा मागणी करूनही ती पूर्ण न झाल्याने त्यांनी आता प्रजासत्ताक दिनी वन विभागाच्या जागेवर ठाण मांडून वृक्षाखाली बैठकी घेणे सुरू केले. यापूर्वी जागा मिळविण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, वनमंत्री, डीएफओ, वनपरिक्षेत्र अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आमदार आणि खासदार यांना निवेदन पत्र पाठवून एक जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मात्र जागा उपलब्ध करून न दिल्याने शेवटी जिल्ह्यातील आदिवासी किसान सैनिकांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देवरीच्या एफडीसीएमच्या डेपोलगत असलेल्या जागेवर अतिक्रमण केले. तसेच आपल्या संस्थेचे फलक व भगवान शंकराची मूर्ती स्थापित करून वनविभागाची जागा बळकावली. सविस्तर असे की, भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईत हजारोंच्या संख्येत आपल्या प्राणांची आहुती देणारे श्री माँझी आंतरराष्ट्रीय समाजवाद आदिवासी किसान सैनिकांना आपल्या संस्थेच्या बैठकी व इतर कार्यक्रम घेण्याकरिता देशात कुठेही जागा उपलब्ध नाही. सन १९५१ पासून हे सर्व सैनिक आपापल्याच घरी कार्यालयाचे फलक लावून संस्था चालवित आहेत. एवढेच नाही तर एखाद्या वेळी झाडाखाली बसून हे सैनिक आपल्या बैठका घेतात. जिल्ह्यात या संस्थेचे १५ हजार सैनिक सदस्य आहेत. त्यांनी २५ फेब्रुवारी २०१५ पासून प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, वनमंत्री, डीएफओ, वनपरिक्षेत्र अधिकारी, एसडीओ, तहसीलदार, आमदार आणि खासदारांना निवेदनपत्र देवून एका ठिकाणी तरी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. याविषयी २६ आॅक्टोबर २०१५ रोजी देवरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनाही निवेदन देऊन सदर जागेचा सातबारा, नकाशा आणि आखीव प्रमाणपत्र दिले होते. या जागेवर दोन-तीन दिवसांपूर्वी ट्रॅक्टरद्वारे जागेचे सपाटीकरण करून वृक्ष लागवडीकरिता खोदकाम सुरू केले. ही बाब आदिवासी किसान सैनिकांना समजताच त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या एका दिवसापूर्वी देवरी येथील परसटोलाच्या संस्था कार्यालयातून शेकडो आदिवासी सैनिकांनी एक रॅली काढून देवरीच्या तहसील कार्यालयासमोरील एफडीसीएमच्या डेपोलगत जागेवर भगवान शंकराची मूर्ती स्थापित केली. तसेच आपल्या संस्था कार्यालयाचे फलक लावून सदर जागेवर अतिक्रमण केले आहे. सदर रॅली काढून जागेवर अतिक्रमण करणाऱ्या या आदिवासी किसान सैनिकांचे नेतृत्व भागी येथील सामाजिक कार्यकर्त्या शालू पंधरे आणि संस्थेचे जिल्हा सचिव तिजूराम टेकाम, जिल्हा कोषाध्यक्ष ज्ञानीराम कुंजाम यांनी केले. या वेळी देवरी तालुका अध्यक्ष शालिकराम पंधरे, तालुका सचिव सेवकराम उईके, देवरी क्षेत्र अध्यक्ष सदाराम टेकाम, कोषाध्यक्ष लक्ष्मण उईके, शाखा अध्यक्ष आसाराम पंधरे, उपक्षेत्र अध्यक्ष धनिराम जिंदाकूर, भर्रेगाव पंचायत सचिव जयराम पुराम, आमगाव तालुका अध्यक्ष मदनलाल उईके, रामचंद्र भलावी, सिरपूर क्षेत्र अध्यक्ष जगन्नाथ गोटे, लोहारा पंचायत सचिव मधूकर मडावी, मुंडीपार पंचायत अध्यक्ष मोतीराम कुराम, छन्नू पुराम, चाळीस गावपंचायत क्षेत्र अध्यक्ष तुळसीदास कुरसुंगे, उपाध्यक्ष भरत मसराम, सालेकसा क्षेत्र सचिव प्रेमलाल इळपाते, देवरी शाखा उपकोषाध्यक्ष सुरजलाल पंधरे, सडक-अर्जुनी अध्यक्ष रामजी इळपाते, कचरूलाल टेकाम, खडकी-बाह्मणी अध्यक्ष सोहनलाल परतेकी, बिसगाव पंचायत क्षेत्र उपाध्यक्ष धनीराम मडावी आणि बहुसंख्य आदिवासी किसान सैनिक पदाधिकारी व सदस्य महिला पुरुष प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)