काचेवानी : सिकलसेल आजारात रक्त पेशी घट्ट व चिकट होत असल्याने त्यांचा पुंजका तयार होतो व रक्त पुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. अवयवांना पुरेसा प्राणवायू मिळत नसल्याने अवयव निकामी होतात. सांधे दुखने व संसर्ग होणे, असे आजार उद्भवतात. त्यामुळे सुखी जीवन जगायचे असेल तर प्रत्येकाने सिकलसेल चाचणी करून घ्यावी, असे आवाहन तिरोड्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी.आर. टेंभुर्णे यांनी केले. तिरोडा पंचायत समितीत सिकलसेल मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन पं.स. सभापती ललिता जांभूळकर यांच्या हस्ते उपसभापती टुंडीलाल शरणागत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून खंडविकास अधिकारी नारायण जमईवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी.आर. टेंभुर्णे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, परिचारिका, विविध विभागाचे कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी खंडविकास अधिकारी जमईवार व उपसभापती शरणागत यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. यात सिकलसेल आजाराचे लक्षण, प्रकार, उपचार, शिक्षण व समाजाची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले.
सुखी जीवनासाठी सिकलसेलची चाचणी करा
By admin | Updated: December 22, 2014 22:49 IST