गोंदिया : जिल्ह्याची स्थिती आतापर्यंत नियंत्रणात असल्याचे वाटत असतानाच शनिवारनंतर आता रविवारीही (दि. २८) म्हणजेच सलग दुसऱ्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा शेकड्यात आला आहे. रविवारी तब्बल १०७ बाधितांची भर पडली असल्याने आता जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक वाढला असून स्थिती गंभीर होत असताना दिसत आहे. यामुळे आता जिल्हावासीयांनी अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. विशेष म्हणजे, ५१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली असून यानंतर बाधितांची संख्या १५६३३ झाली असून यातील ७४० रूग्ण क्रीयाशील आहेत.
रविवारी जिल्ह्यात आढळून आलेल्या १०७ बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यातील ५१, तिरोडा ५, गोरेगाव २, आमगाव ७, सालेकसा ५, देवरी १४, सडक-अर्जुनी ६ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १७ रुग्ण आहेत. तर ५१ रुग्णांनी मात केली असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील २७, तिरोडा ९, गोरेगाव ६, आमगाव १, सडक-अर्जुनी ४, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ३ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १ रुग्ण आहे. यानंतर आता जिल्ह्यात ७४० रुग्ण क्रियाशील असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३५६, तिरोडा ७४, गोरेगाव २५, आमगाव ७४, सालेकसा २०, देवरी ६१, सडक-अर्जुनी ३२, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ८६ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १२ रूग्ण आहेत.
या क्रियशील रूग्णांपैकी ५६४ रूग्ण घरीच अलगीकरणात असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील २९९, तिरोडा ४७, गोरेगाव १९, आमगाव ६१, सालेकसा १३, देवरी ३९, सडक-अर्जुनी १९ तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६७ रूग्ण आहेत. यानंतर आता जिल्ह्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०६ टक्के एवढे असून रूग्ण व्दिगुणीत गती ३८०.२ दिवस नोंदण्यात आली आहे. मात्र शनिवारी १०० त्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी रविवारी बाधितांची संख्या १०७ एवढी झाली असून त्यात वाढ होत असल्याने जिल्ह्यातील स्थिती आता गंभीर होत असताना दिसत आहे.
-----------------------------
आतापर्यंत १८८ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे १८८ रूग्णांचा जीव गेला असून हीच बाब टेन्शन वाढविणारी आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील १०५, तिरोडा २५, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ११ तर इतर राज्य व जिल्ह्यातील १० रूग्ण आहेत. यामुळे जिल्हयातील मृत्यू दर १.२० टक्के नोंदण्यात आला आहे.
-----------------------------
गोंदिया तालुक्यात कोरोनाचा स्फोट
जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासूनच गोंदिया तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून येथेच सर्वाधिक रूग्ण निघाले असून रूग्णांचा मृत्यूही झाला आहे. त्यात आजघडीला तालुक्यातील स्थिती बघितल्यास रविवारी गोंदिया तालुक्यात सर्वाधिक ५१ रूग्ण निघाले आहेत. यानंतर तालुक्यातील बाधितांची संख्या तब्बल ३५६ झाली आहे. विशेष म्हणजे, अन्य तालुक्यांत बाधित रूग्ण संख्या १०० च्या आत आहे तेथेच गोंदिया तालुक्यात ३५६ रूग्ण असल्याने गोंदिया तालुक्यात कोरोनाचा जास्त कहर दिसत आहे. अशात आता नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.