शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातल्या शाळेच्या इमारतीवर वीज पडून 10 विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 18:50 IST

जि. प. प्राथमिक शाळेच्या इमारतीवर वीज कोसळल्याने वर्गातील १० विद्यार्थी जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.५) दुपारच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील एकोडी येथे घडली.

एकोडी (गोंदिया) : जि. प. प्राथमिक शाळेच्या इमारतीवर वीज कोसळल्याने वर्गातील १० विद्यार्थी जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.५) दुपारच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील एकोडी येथे घडली. गुरुवारी दुपारच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर वीज पडली. ज्या खोलीवर वीज पडली तेथे इयत्ता पहिल्या वर्गाचे वर्गाचे एकूण ४७ विद्यार्थी बसले होते. यात दहा विद्यार्थी जखमी झाले.जखमीपैकी २ विद्यार्थी गंभीर जखमी झाले तर आठ विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. इमारतीवर वीज कोसळल्याने कवेलूचे तुकडे पडून विद्यार्थ्याना दुखापत झाली. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी काही वेळ गोंधळून गेले होते. वीज पडल्याचा आवाज होताच विद्यार्थी वर्गातून सैरावैरा पडू लागले. ज्या खोलीत विज पडली तेथील विद्युत सामानाचे देखील नुकसान झाले. दरम्यान शिक्षकांनी वेळीच प्रसंगावधान दाखवित जखमी विद्यार्थ्यांना तातडीने एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. एन.जी.अग्रवाल व इतर वैद्यकीय अधिका-यांनी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार केले.दरम्यान जखमी सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. जखमी विद्यार्थ्यांमध्ये रेहान कलाम शेख, अरपीत हेतराम पटले, साक्षी अशोक ढोमणे, दुर्गेश सुरेश टेंभरे, आर्ची नंदकिशोर बिसेन, सीया मोहनलाल बावनकर, विक्की संजय रहांगडाले, लव गिरीधारी अंबुले, अन्नपूर्णा गजेंद्र रहांगडाले, लक्की धनपाल हरिणखेडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.पालकांनी घेतली शाळेकडे धावजिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर विज कोसळून विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती गावात माहिती होताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेकडे धाव घेतली. तसेच शिक्षकांना गाठून आपला पाल्य सुरक्षित असल्याची खात्री करुन घेतली. तर अनेक पालक विद्यार्थ्यांना घरी घेवून गेले.विद्यार्थ्यांसह शिक्षकही हादरलेवीज पडल्यानंतर वर्गात मोठ्या प्रमाणात धुर पसरल्याचे वर्ग शिक्षक के.के. हरिणखेडे यांनी प्रतिनिधीशीे बोलताना सांगितले. दुपारी २ ते २.३० वाजता दरम्यान विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. याच दरम्यान वर्गखोलीच्या एका बाजुला विज पडली. यात दहा विद्यार्थी जखमी झाले. विज पडल्यानंतर पाच ते दहा मिनिटे काय करावे हेच सुचत नव्हते. दरम्यान या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक हादरल्याचे हरिणखेडे यांनी सांगितले.