शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

जिल्ह्याचे तापमान ४५ डिग्रीच्या घरात

By admin | Updated: June 8, 2014 00:01 IST

शनिवारपासून मृग नक्षत्राला सुरूवात झाली असली तरी जिल्ह्यात पाऊस काही फिरकलेला नाही. उलट तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ३१ मे रोजी जिल्ह्यात

गोंदिया : शनिवारपासून मृग नक्षत्राला सुरूवात झाली असली तरी जिल्ह्यात पाऊस काही फिरकलेला नाही. उलट तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ३१ मे रोजी जिल्ह्यात सर्वाधिक ४५.१ एवढी तापमानाची नोंद घेण्यात आली होती. मागील दिवसांत मात्र हा रिकॉर्ड तुटला असून आता पारा ४५.३ च्या घरात गेल्याची नोंद शासकीय यंत्रणेने घेतली आहे. तर कमाल तापमानासह किमान तापमान सुद्धा चढले असून २९.८ एवढी नोंद घेण्यात आली आहे. एप्रिलच्या सुरूवातीच्या पंधरवड्यानंतर उन्हाळा आपल्या रंगात आला, तर मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली. यावर्षी ३१ मे रोजी सर्वाधिक तापमान ४५.१ अं.से. पेक्षा जास्त नोंदविण्यात आले. यामुळे उष्णतेच्या लाटेने जनजीवनावर तीव्र परिणाम झाला. दुपारी १२ वाजतानंतर घराबाहेर पडणे नागरिकांनी बंद केले आहे. शहरातील रस्ते व बाजारपेठ १२ ते ५ या वेळेत सामसूम असते. एकंदरीत शहरात अघोषित संचारबंदी असते. गेल्या आठ दिवसांपासून सतत गोंदियाचे तापमान ४३ अंशांपेक्षा जास्त राहत असल्यामुळे दुपारी १२ वाजतानंतर कोणीच घराबाहेर पडताना दिसत नाही.नवतपाचा हा कहर म्हणता आला असला तरीही आता नवतपा नसतानासुद्धा तापमान वाढतच चालले आहे.  कारण ६ जून रोजी कमाल तापमान ४५.३ अं.से. नोदण्यात आले होते. तर उन्हाची तीच दाहकता ७ जून रोजीही दिसून आली. ७ जून रोजी कमाल तापमान ४५.३ एवढे नोंदण्यात आले. विशेष म्हणजे किमान तापमानही चांगलेच वाढल्याचीही नोंद घेण्यात आली. कमाल तापमान २९.८ अं.से. एवढे नोंद घेण्यात आले. उष्णतेच्या या लाटेने गोंदिया चांगलाच तापत असून अशात कुलरसुद्धा काम करीत नसल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. उष्णतेचा कोप सुरू असतानाच त्यात वेळी-अवेळी होत असलेले भारनियमन जखमेवर मिठाचे काम करीत आहे. उकाड्याने अंगाची लाही-लाही होत असल्याने नागरिक बाहेर निघणे टाळत आहेत. तर भारनियमनामुळे घरात जीव गुदमरू लागला असून नागरिकांसाठी इकडे-आड व तिडके विहीर अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. मान्सून आणखी चार दिवसांनी दाखल होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यामुळे आणखी चार दिवस या भट्टीत काढावेच लागणार आहेत. यात ही  विशेष बाब म्हणजे दिवस तर कडक उष्णतेत कापावा लागतच आहे. मात्र   किमान तापमानही २९.८ अं.से. पर्यंत  पोहोचल्याने रात्रीही उष्ण लपटांचे चटके बसतच आहे. आता असह्या झालेल्या या उष्णतेपासून मुक्तता मिळावी यासाठी सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)