शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दूरभाष केंद्राची सेवा विस्कळीत

By admin | Updated: July 19, 2015 01:34 IST

जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी व नक्षलग्रस्त तालुका म्हणून परिचीत असलेल्या देवरी तालुक्यातील दुरसंचार विभागाची दुरभाष सेवा विस्कळीत झाल्याने ...

देवरी : जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी व नक्षलग्रस्त तालुका म्हणून परिचीत असलेल्या देवरी तालुक्यातील दुरसंचार विभागाची दुरभाष सेवा विस्कळीत झाल्याने तालुक्यातील शासकीय व खासगी आणि बँक सेवा ठप्प झाली आहे. या बाबीकडे येथील अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. या कार्यालयात अधिकारी कार्यालयात राहत नसून इतरत्र भटकत असतात.सविस्तर असे की, अतिदुर्गम आदिवासी व नक्षलग्रस्त तालुका म्हणून जिल्ह्यात परिचीत असलेल्या देवरी तालुक्यातील दुरसंचार विभागाची दुरभाष सेवा सध्या पूर्णपणे विस्कळीत झाली. यात देवरी, चिचगड व ककोडी केंद्राची नेट सेवा व लँडलाईन सेवा ठप्प झाली आहे. या देशात अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तेवर येणाऱ्या भाजप सरकारच्या नियंत्रणातील दुरभाष सेवा या तालुक्यात पूर्णपणे विस्कळीत झाली. जर या संबंधात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिक या कार्यालयात गेले असता येथे अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित राहत नाही. अशा दुर्गम आदिवासी भागातील नेट सेवा आणि दुरध्वनी सेवा मागील ८-१० दिवसांपासून कोलमडली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व शासकीय, खासगी लोकांना नेट सेवा बरोबर मिळत नाही. तसेच दुरध्वनी सेवाही पूर्णपणे बंद आहे. तरी या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देवून या समस्येचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी या तालुक्यातील पत्रकार संघ, व्यापारी संघटना, कर्मचारी संघटना तसेच दुरसंचार विभागाचे खातेदारांनी केली आहे. या केंद्राचे उपविभागीय अभियंता चावला यांना या समस्येबाबत सांगण्याकरिता त्यांच्या भ्रमणध्वनीवर फोन केले असता त्यांचा भ्रमणध्वनी नेहमीच बंद दाखविते अशी येथील नागरिकांची तक्रार आहे. देवरी तालुक्यातील दूरसंचार सेवा विष्कळीत झाली असून याचा त्रास विद्यार्थी, शिक्षक, व्यापरी व नागरिकाना होत आहे. मात्र संबधित अधिकारी झोपेत आहेत. (वार्ताहर)