शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श नागरिक घडविण्याचे पवित्र कार्य शिक्षकांच्या हाती

By admin | Updated: July 19, 2015 01:32 IST

शिक्षकांच्या चिती अवघ्या विद्यार्थ्यांची व्याप्ती, या उक्तीनुसार शिक्षक हा सतत धडपडणारा असावा.

विजय सूर्यवंशी : सहयोग शिक्षक मंचच्या पदाधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा गोंदिया : शिक्षकांच्या चिती अवघ्या विद्यार्थ्यांची व्याप्ती, या उक्तीनुसार शिक्षक हा सतत धडपडणारा असावा. हाच ध्यास शिक्षकांचा असावा. विविध उपक्रमाच्या माध्यमातून शाळा व गावचा कायापालट होऊ शकते. क्रियाशिल शिक्षकांच्या माध्यमातून तसेच विविध समूहाकडून उत्तुंग कार्य महाराष्ट्रात केले जात आहे. नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षा, वैयक्तिक सांघिक खेळ यामधून आदर्श नागरिक, अधिकारी घडविण्याचे पवित्र कार्य शिक्षकांच्या हाती आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केले.सहयोग शिक्षक मंचच्या पदाधिकाऱ्यांसोबत गुरूवारी (दि.१६) कार्यालयात चर्चा करताना ते बोलत होते. प्रधान सचिव शालेय शिक्षण महाराष्ट्र नंदकुमार यांच्या सहविचार सभेत सहयोग शिक्षक मंचच्या विविध शैक्षणिक, सामाजिक कार्यावर चर्चा करण्यात आली. यावेळीे सहयोग शिक्षक मंचासोबत डॉ. सूर्यवंशी यांनी विविध विषयांवर चर्चा केली. चर्चेत सहयोगमार्फत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. वक्तृत्व, निबंध व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, बेटी बचाव, बेटी पढाओ अंतर्गत ४० दाम्पत्यांचा सत्कार हे कार्यक्रम स्तूत्य असल्याचे ते म्हणाले. कोल्हापूर येथे ‘गुढीपाडवा, प्रवेश वाढवा’, ‘अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा’, पीएचसी कायापालट, मॅथ कमांडो, असे विविध उपक्रम राबविले. यात ५००० शिक्षकांमधून ५०० शिक्षक गणितात तरबेज बनवून मॅथ कमांडो मार्फत सर्वांना प्रशिक्षण दिले. पीएचसी कायापालट मध्ये सर्व जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांचा गट बनवून प्रभावी कार्य केले. त्यास सध्या राज्य शासनाने मॉडेल म्हणून स्विकारले आहे. येथील स्व. खे. मंडळाच्या अधिकाऱ्यांची लवकरच सभा घेवून विद्यार्थ्यांना हितावह बदल करून वैयक्तिक खेळास विशेष प्राधान्य देण्यात येईल. जिल्ह्यात गाव तेथे वाचनालय उपक्रम राबविण्याचे ध्येय असल्याचे सांगितले. नवोदय व शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेसाठी नियोजन करणार असल्याचे सांगितले. चर्चेला आर.आर. अगडे, अध्यक्ष एच.एस. शहारे, सचिव युवराज माने, अशोक चेपटे, युवराज बडे, अरविंद कोटरंगे, विजेंद्र केवट, जी.पी. बिसेन, श्रीकांत कामडी, किशोर गर्जे, प्रमोद बघेले, एन.आर. शिरसाट, बी.पी. दराडे, शिवाजी बडे, वाय.बी. पटले, मुरकुटे, संदीप सोमवंशी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)