शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अध्ययनस्तर उंचावण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:16 IST

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. पण अध्ययन निष्पत्तीनंतर गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गोंदिया तालुका मागे आहे. याकरिता सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपआपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा विषयानुरुप अध्ययनस्तर उंचाविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला केंद्र प्रमुख एन.बी.कटरे यांनी दिला.

ठळक मुद्दे एन.बी.कटरे : नंगपुरा मुर्री येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. पण अध्ययन निष्पत्तीनंतर गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गोंदिया तालुका मागे आहे. याकरिता सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपआपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचा विषयानुरुप अध्ययनस्तर उंचाविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला केंद्र प्रमुख एन.बी.कटरे यांनी दिला.शासकीय आश्रम शाळा नंगरपूरा (मुर्री) येथे आयोजित केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत ते मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जनता हायस्कुल चुटियाचे मुख्याध्यापक एन.के.शेंडे हे होते. या वेळी मुख्याध्यापिका उमा उके, छाया कोसरकर, अल्का चित्रिव, शिवाणी अग्रवाल, मुख्याध्यापक व्ही.एस. हसबन, आर. बी. बाचकवार व मुख्याध्यापक उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात माता सरस्वती व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करुन करण्यात आली. मुर्रीच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना व स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. याप्रसंगी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अध्ययनस्तर निश्चिती करण्याची गरज काय? डिजीटल व शैक्षणिक साहित्यांचा दैनदिन अध्यापनात वापर, मुल्य संवर्धन, भाषा संबोध, गणित संबोध, दप्तराचे ओझे कमी करणे, स्वच्छता व मोकळीका यावर सविस्तर मार्गदर्शन साधन व्यक्ती विनोद परतेती, ज्योती पारधी, तज्ज्ञ मार्गदर्शक के.आर. गोटेफोडे, एल. यू. खोब्रागडे, के.जे.बिसेन यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन जी.एस. कोसलकर तर आभार एम.डी.फड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता एल.एस.मरकाम, आर.जी.हुमणे, एम.आर.वाटमोडे, नागसेन भालेराव, ओ.एल.नंदनवार, एस.बी.पटले, एम.ए. बागडे, डी. आय. खोब्रागडे, सोनवाने, अजय कावळे, वर्षा कोसरकर, पूजा चौरसिया, के.एस.होरे, चौरे, वालदे, वैद्य, अवस्थी, ठाकरे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Teacherशिक्षक