शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सालेकसा तालुक्यात शिक्षकांची पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 23:50 IST

राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी, नक्षलग्रस्त तालुका म्हणून सालेकसा तालुक्याची ओळख आहे. तालुक्याच्या विकासासह शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदांमुळे शिक्षण विभागाला सुद्धा ग्रहण लागल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपालकांमध्ये रोष : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

सागर काटेखाये ।लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी, नक्षलग्रस्त तालुका म्हणून सालेकसा तालुक्याची ओळख आहे. तालुक्याच्या विकासासह शिक्षकांच्या रिक्त असलेल्या पदांमुळे शिक्षण विभागाला सुद्धा ग्रहण लागल्याचे चित्र आहे.यावर्षी जून महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या. अनेक शिक्षकांनी आपल्या सोयीनुसार गावांची नावे आॅनलाईन अर्जामध्ये भरली होती. त्यानुसार शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यात सालेकसा तालुक्यातून अनेक शिक्षक बदलून गेले. मात्र आदिवासी, नक्षलग्रस्त क्षेत्रात बरेच शिक्षक बदली झालेल्या ठिकाणी जाण्यास बरेच शिक्षक इच्छुक नाहीत.परिणामी बऱ्याच जि.प.प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तालुक्यात जि.प.हायस्कूलची संख्या दोन तर १११ प्राथमिक शाळा आहेत. पद मान्यतेनुसार उच्च श्रेणी मुख्याध्यापक १३ असून एक पद रिक्त आहे. पं.स. सालेकसा अंतर्गत जि.प.शाळा बोदलबोडी येथे मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे.पदवीधर शिक्षकांची संख्या १०४ आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ८५ शिक्षक कार्यरत आहेत. २६५ सहाय्यक शिक्षकांचे पद मान्य असताना केवळ २६१ शिक्षक कार्यरत आहेत. जि.प.शाळांकरीता असूनही ४१ शिक्षकांची पदे त्वरीत भरण्याची गरज आहे.शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्याच्या ज्ञानार्जनात अडचणी येत आहेत. दुर्गम भागातील शाळांमध्ये वर्ग ४ मात्र शिक्षक एक किंवा २ अशी अवस्था आहे. त्यामुळे जि.प.च्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत आहे.शासनाद्वारे प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढविण्याकरीता गुणवत्ता विकास कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविला जातो. परंतु शिक्षकांच्या कमतरतेमुळे गुणवत्ता विकास कसा होईल? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकदा प्रकृतीमध्ये किंवा इतर कारणामुळे शिक्षक सुट्टीवर असतात. अशावेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खेळखंडोबा निर्माण होते.यामुळेच जि.प.शाळांमध्ये आपल्या पाल्यांना शिकविण्याचा पाल्यांचा कल कमी होत असल्याचे चित्र आहे. शासनाद्वारे शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करुनही कर्मचाºयांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्याची गुणवत्ता खालावलेली आहे.तालुक्यात शिक्षकांची ४३ पदे रिक्त आहेत. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये, याची काळजी घेतली जाते. कार्यरत शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम केले जात आहे.- एस.जी.वाघमारे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक