शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातील शिक्षक नक्षलभत्त्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:53 IST

गोंदिया जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शिक्षकांना जि.प.शिक्षण विभागाने नक्षलभत्त्यापासून वंचित ठेवल्याने शिक्षकांमध्ये रोष आहे.

ठळक मुद्दे शिक्षकांमध्ये रोषजि.प.शिक्षण विभागाचा दुजाभाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारने संपूर्ण गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त म्हणून घोषीत केला आहे. यातंर्गत २००२ च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना नक्षलभत्ता लागू केला आहे. पण जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शिक्षकांना जि.प.शिक्षण विभागाने नक्षलभत्त्यापासून वंचित ठेवल्याने शिक्षकांमध्ये रोष आहे.राज्य सरकारने गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त म्हणून घोषीत केला आहे. ६ ऑगस्ट २००२ रोजी शासन आदेश काढून नक्षलग्रस्त जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना घरभाडे माफ अनुज्ञप्ती शुल्क ४६० रुपये प्रोत्साहान भत्ता १५०० रुपये सुचविला आहे. मात्र गोंदिया जि.प.ने शासन निर्णयावर आपली युक्ती लावून नवीन फंडा शोधून काढला आहे. परिणामी शिक्षकांना नक्षलभत्ता मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तिरोडा व सालेकसा तालुक्यातील शिक्षकांना त्या तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांनी १५०० रुपयांप्रमाणे शिक्षकांना भत्ता देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ७ कोटी रुपयांची थकबाकीची देयके सुध्दा मंजूर करण्यात आली आहे. मात्र देवरी, आमगाव, सालेकसा, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव, देवरी, गोंदिया या सहा तालुक्यातील शिक्षक अद्यापही या नक्षल भत्त्यापासून वंचित आहेत.त्यामुळे मागील १३ वर्षांपासून शिक्षकांचा या मागणीसाठी जि.प.शिक्षण विभागाकडेलढा सुरू आहे.शासनाचे नियम सर्वांसाठी सारखे असताना जि.प.शिक्षण विभागाच्या सहा तालुक्यासाठी लागू केलेल्या सावत्र धोरणामुळे शिक्षकांमध्ये रोष व्याप्त आहे. विशेष म्हणजे नक्षलभत्ता काढण्याच्या नावावरही शिक्षकांकडून अनुदान मागण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सुध्दा हा मुद्दा अनेकदा उपस्थित केला. तसेच सहा तालुक्यातील शिक्षकांना २००६ पासून नक्षलभत्ता लागू करण्याची मागणी केली. पण यानंतरही शिक्षण विभागाकडून यासंदर्भात कुठलेच पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षकांनी जि.प.शिक्षण विभागावर दुजाभाव करण्याचा आरोप केला आहे.जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी एम.राजा दयानिधी यांनी याप्रकरणाची दखल घेवून शिक्षकांना नक्षलभत्ता देण्याची मागणी केली आहे. अन्यथा याविरुध्द तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक