शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

जि.प.वर शिक्षक संघाचा मोर्चा

By admin | Updated: May 1, 2017 00:52 IST

आपल्या विविध मागण्यांना घेवून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा जिल्हास्तरीय मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला.

विविध मागण्या : जि.प. अध्यक्षांनी दिली समस्या मार्गी लावण्याची हमी गोंदिया : आपल्या विविध मागण्यांना घेवून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा जिल्हास्तरीय मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला. या वेळी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांना निवेदन दिले. सदर मोर्चाचे आयोजन शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्रकुमार कटरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी मोर्चा व धरणे आंदोलनात प्रामुख्याने विभागीय अध्यक्ष नूतन बांगरे, कोषाध्यक्ष सुधीर वाजपेयी, संपर्क प्रमुख नागसेन भालेराव, संघटक केदारनाथ गोटेफोडे, शंकर नागपुरे, वाय.एस. मुंगुलमारे, ओमेश्वरी बिसेन, शंकर चव्हाण, पवन कोहळे, सुमेधा गजभिये, पी.के. पटले उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस अनिरूद्ध मेश्राम यांनी मांडले. तसेच जिल्हा कार्याध्यक्ष यू.पी. पारधी, जुणी पेंशन हक्क योजनेचे सचिव सचिन राठोड, दुर्गाप्रसाद कोकोडे, वाय.बी. पटले, विजय डोये, विनोद लिचडे, गणेश चुटे, जी.जी. खराबे, अरविंद उके, राजू गुन्नेवार, राहुल कोतमवार, यशोधरा सोनेवाने, नितू डहाट यांनी मोर्चाला संबोधन केले. यानंतर शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना निवेदन दिले. तसेच शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांच्या सभा कक्षामध्ये पाचारण करण्यात आले. या वेळी शिक्षणाधिकारी (प्राथ) उल्हास नरड, वित्त व लेखाधिकारी मडावी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल. पुराम यांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या जिल्हास्तरावरील मुद्यांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. त्यावेळी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांनी संपूर्ण मुद्दे निकाली काढण्याची हमी दिली. शेवटी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे व जि.प.चे शिक्षण तथा आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांनी धरणे आंदोलनाला भेट दिली. मोर्चात डी.एस. कोल्हे, सी.एस. कोसरकर, दिनेश बोरकर, मयूर राठोड, राहुल कळंबे, वाय.एस. भगत, ए.डी. पठान, सचिन राठोड, वामनराव गोळंगे, संतोष बिसेन, राजू पाटील, टी.आर. लिल्हारे, रमेश संग्रामे, जी.जी. दमाहे, डी.बी. पटले, एन.एस. कोरे, अरविंद नाकाडे, रमेश भलावी, राजू कटरे, सुरेश मेश्राम, चेतन उईके, एस.बी. परिहार, के.बी. गभणे, नंदा पारधी, भीमराव गहाणे, बडवाईक आदी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.(प्रतिनिधी) जिल्हास्तरावरील मागण्या प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला वेतन जमा करावे. दर दोन महिन्यांनी संघटनेला शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ द्यावे. पं.स. सडक-अर्जुनी येथील जीपीएफची अफरातफर झाली असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हे प्रकरण वित्त व लेखाधिकाऱ्यांनी सोडवावे. मार्च २०१४ पासून शिक्षकांच्या जीपीएफ खात्यात एकही रक्कम जमा झाली नाही. ती त्वरित जमा करून दोन वर्षांच्या पावत्या शिक्षकांना द्यावे. वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके तात्काळ मंजूर करण्यात यावी. १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणीची यादी काढावी. महिला शिक्षकांची प्रसूती रजा पूर्व मंजूर करून नियमित वेतन द्यावे, आदी अनेक मागण्यांचा समावेश आहे.