शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
5
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
6
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
7
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
8
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
9
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
10
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
11
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
12
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
13
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
14
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
15
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
16
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
17
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
18
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
19
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
20
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

पंचायत समितीवर शिक्षकांची धडक

By admin | Updated: March 30, 2015 01:11 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या देवरी शाखेच्यावतीने जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, जिल्हा सहसचिव संदीप तिडके, ...

देवरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या देवरी शाखेच्यावतीने जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे, जिल्हा सहसचिव संदीप तिडके, तालुकाध्यक्ष गजानन पाटणकर व कार्याध्यक्ष जी.एच. बैस यांच्या नेतृत्वात पंचायत समितीमधील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन १५० च्या वर शिक्षकांनी २६ मार्च रोजी पंचायत समितीवर धडक दिली. गटशिक्षणाधिकारी किशोर भांडारकर यांच्या दालनात घडलेल्या चर्चा दरम्यान आठ दिवसांत शिक्षकांच्या समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन त्यांनी शिक्षकांना दिले. यावर ३१ मार्च रोजी आयोजित एक दिवसीय धरणे आंदोलन स्थगीत करण्यात आले. सहाव्या वेतन आयोगाचा ५ वा हप्ता जमा करणे, नियमित झालेल्या निमशिक्षकांची थकबाकी काढणे, शालेय पोषण आहार, इंधन, भाजीपाला खर्च व मदतनिसांचे मानधन फेब्रुवारीपर्यंत काढणे, सेवापुस्तिका अद्ययावत करणे, चटोपाध्याय व निवडश्रेणीचे प्रस्ताव जिल्हापरिषदेकडे पाठविणे, उच्च परीक्षेला बसण्याचे अर्ज जिल्हापरिषदेकडे पाठविणे, पुरवणी बिले काढणे, डी.सी.पी.एस.ची प्रकरणे निकाली काढणे, प्रवासभत्ता देयके काढणे, अर्जित रजा प्रकरणे मंजूर करुन सेवापुस्तिकेत नोंद घेणे, नरेंद्र अमृतकर यांची जीपीएफ कपात पाठविणे, संजीव मेश्राम यांचे रजा प्रकरण निकाली काढणे आदी मागण्यांना घेऊन शिक्षकांनी पंचायत समितीवर धडक दिली. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी भांडारकर यांच्या दालनात मागण्यांवर चर्चा करण्यात आली. चर्चेला गटशिक्षणाधिकारी भांडारकर यांच्यासह एल.यू. खोब्रागडे, गजानन पाटणकर, संदीप तिडके, जी.एस.बैस, सुरेश कश्यप, नरेश बडवाईक, एल.यू. तवाडे, एस.जी. चांदेवार, डी.एम. कापसे, गणेश राठोड, मांढरे, ओ.आर. दखणे, तेजराम नंदेश्वर, संदीप खेडीकर, ईश्वर माहुले, किशोर ब्राम्हण, प्रकाश गावळ, पंचायत समिती सदस्य ओमराज बहेकार, शिक्षण विस्तार अधिकारी आर.एस. येटरे व वरिष्ठ सहायक फुळसाय उपस्थित होते. चर्चेदरम्यान गटशिक्षणाधिकारी भांडारकर यांनी आठ दिवसात संपूर्ण मागण्या पूर्ण केल्या जातील असे लेखी आश्वासन दिले. यावर मात्र शिक्षक समितीने एक दिवसीय धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रसंगी आर.डी. बारापात्रे, पुरुषोत्तम गहाणे, नरेंद्र अमृतकर, विरेंद्र खोटेले, उत्तम टेंभुरकर, प्रदीप बडोले, पंकज राठोड, प्रकाश गावळ, भागवत भोयर, मोवाडे, लांजेवार, बी.आर. खोब्रागडे, नरेंद्र राणे, प्रवीण सरगर, संजय कुऱ्हे, संजय राऊत, गोरक्ष कत्करे, आर.एस. रघुर्ते, बी.सी. टेंभरे, अरुण वैद्य, तपेश काशीवार, एस.ए. वासनिक, बोरकर, मिथून चव्हाण, घुगे, नरेंद्र राणे, बारसे, सलामे, मेळेसर, गेडाम, दिगंबर नंदनवार तसेच समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)