शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

शिक्षक समिती करणार धरणे आंदोलन

By admin | Updated: May 30, 2014 23:59 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या तीन महिन्याच्या प्रलंबित वेतनासाठी व इतर समस्या निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक

गोंदिया :  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदियाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या तीन महिन्याच्या प्रलंबित वेतनासाठी व इतर समस्या निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित व जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद गोंदियाच्या कार्यालयासमोर ७ जूनला शिक्षक समिती धरणे आंदोलन करणार आहे.गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना आयकर कपातीमुळे माहे फेब्रुवारी महिन्याचे पगार अल्पशा मिळाले आहे. फेब्रुवारीनंतर मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्याचे वेतन न मिळाल्यामुळे शिक्षकांवर उपासमारीची पाळी आली आहे.कोणत्याही कर्मचार्‍याला महिन्याच्या एक तारखेला वेतन देण्याचे आदेश असूनसुद्धा शालार्थ प्रणालीप्रमाणे वेतन देण्यात येणार असे सांगून जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना तीन महिन्यापासून वंचित ठेवले आहे. ज्यामुळे शिक्षकांना उपजिविका चालविण्याकरिता अनेक कष्ट भोगावे लागत आहे. पगार न झाल्यामुळे शिक्षकांवर इतर पतसंस्थेच्या बँकेचा नाहक व्याज सहन करावे लागत आहे. याला जिल्हा परिषदेचे अधिकारी जबाबदार ठरत आहेत.मुख्यालयी जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना पूर्वी प्रमाणे वेतन देण्यात आले आहे. परंतु शिक्षकांना शालार्थ प्रणालीचा मुद्दा समोर करुन आजपर्यंत वेतनापासून वंचित ठेवले आहे. याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यपालन अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन सदर महिन्याचे वेतन ५ जूनपर्यंंत करण्याची विनंती केली आहे. जर ५ जूनपर्यंंत पगार देण्यात आले नाही तर ७ जूनला जिल्हा परिषद गोंदियाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष दीक्षित, महासचिव एल.यू. खोब्रागडे, कार्याध्यक्ष शेषराव येडेकर, उपाध्यक्ष किशोर डोंगरवार, चिटनिस पी.आर. पारधी, कोषाध्यक्ष एस.सी. पारधी, संघटक व्ही.जी. राठोड, महिला प्रतिनिधी मनु उके, टेलन बन्सोड, पुष्पा तुरकर, संचालक सुरेश रहांगडाले, बेनीराम भानारकर, तुळसीकर, बडवाईक, चव्हाण यांनी केले आहे.