शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात सर्व प्रकारच्या आॅनलाईन कामावर शिक्षकांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 10:46 IST

प्राथमिक शिक्षक शालेय कामाव्यतिरीक्त १ डिसेंबरपासून बीएलओ व सर्व प्रकारच्या आॅनलाईन कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अर्जुनी-मोरगाव शाखेने दिला आहे.

ठळक मुद्देपोषण आहारावरही बहिष्कारशाळाबाह्य कामाचा परिणाम शैक्षणिक दर्जा घसरण्यावर

आॅनलाईन लोकमतगोंदिया : शिक्षणाचा अधिकार अधिनियम कायद्यानुसार सार्वत्रिक निवडणूक जनगणना या व्यतिरीक्त अन्य कोणतेही शाळाबाह्य काम शिक्षक कर्मचाºयांना बंधनकारक नाही. मात्र यानंतर शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा बोझा लादला जात आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षक शालेय कामाव्यतिरीक्त १ डिसेंबरपासून बीएलओ व सर्व प्रकारच्या आॅनलाईन कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती अर्जुनी-मोरगाव शाखेने दिला आहे.या संबंधाने शिक्षक संघटनांनी बुधवारी (दि.२२) साई मंदिर येथे सभा घेतली. त्यानंतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी तथा पंचायत समिती सभापती यांना दिले. शिक्षकांचे पगार देयक वगळता इतर कोणत्याही प्रकारची आॅनलाईन कामे १ डिसेंबर २०१७ पासून शिक्षक करणार नाहीत. त्याची व्यवस्था शिक्षण विभागाने पंचायत समिती स्तरावरच करावी, शासनाने धान्यादी वस्तुचां आतापर्यंत कंत्राटदार न नेमल्याने आतापर्यंत शाळांना धान्याचा पुरवठा केला नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांना धान्याची खरेदी स्वत:च्या पगारातून करणे अशक्य होत आहे. त्यामुळे शासनाकडून जोपर्यंत धान्याचा पुरवठा होत नाही. तोपर्यंत १ डिसेंबर २०१७ पासून शालेय पोषण आहार तयार करण्याच्या कामावरही बहिष्कार राहणार आहे. याची कोणतीही जबाबदारी मुख्याध्यापक किंवा शिक्षकांवर राहणार नाही. त्याचप्रमाणे १७ नोव्हेंबर २०१७ च्या पत्रानुसार प्राथमिक शिक्षकांकडे बुथ लेव्हल आॅफीसर बीएलओची कामे सोपविण्यात आली आहे. परंतु शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार सार्वत्रिक निवडणूक, जनगणना या व्यतिरीक्त अन्य कोणतेही कामे शिक्षक कर्मचाऱ्यांना बंधनकारक नाही. मतदार याद्या तयार करणे,  निरीक्षण करणे हे निरंतर चालणारे कामे आहेत. आॅनलाईन कामात बहुतांशी वेळ वाया जावू लागल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्याचा शैक्षणिक व शिकविणे कार्यावर होत आहे. शाळेत शिक्षकांना शैक्षणिक कार्यासोबतच आॅनलाईन कामे, खेळाची तालीम घ्यावी लागत आहे. त्यामुळे सर्व मुख्याध्यापक व संघटनाचे सर्व शिक्षक पदाधिकारी यांनी तातडीची बैठक घेवून यापुढे बीएलओची व आॅनलाईनची कामे करणार नाही, अशी भूमिका घेत आहेत.

टॅग्स :educationशैक्षणिक