शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक जुंपले खड्डे खोदण्याच्या कामात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 22:32 IST

पावसाळा तोंडावर आहे. शाळा सुरु व्हायला अजून एक महिना शिल्लक आहे. पण शासनाने शिक्षकांना कामाला जुंपले आहे. वृक्ष लागवड करण्यासाठी शाळा व परिसरात खड्डे खोदण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढला आहे.

ठळक मुद्देवृक्षलागवड : शिक्षण विभागाने काढला फतवा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पावसाळा तोंडावर आहे. शाळा सुरु व्हायला अजून एक महिना शिल्लक आहे. पण शासनाने शिक्षकांना कामाला जुंपले आहे. वृक्ष लागवड करण्यासाठी शाळा व परिसरात खड्डे खोदण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढला आहे.दरवर्षी १ ते ३१ जुलै या काळात वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम घेतला जातो. प्रचार अन प्रसार करण्यासाठी मोठ्या स्तरावर रुपये खर्च केले जातात. त्या खर्चाचे पध्दतशीर नियोजन केले जाते. पण शाळांना किंबहुना मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या कमाईतून पैसा वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी दरवर्षी खर्च होतो.खड्डे खोदण्याचे निर्देश प्रशासनाने मुख्याध्यापकांना दिले आहेत. त्या निर्देशाचे पालन मुख्याध्यापक करीत आहेत.शिक्षकच मजुरांकडून झाडे लागवड करण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम करीत आहेत. अनेक शाळांमध्ये सदर काम सुरु आहे. खड्डे खोदण्याचा खर्च, त्यानंतर वृक्ष खरेदी व इतर कार्यक्रमांवर येणारा खर्च शिक्षक व मुख्याध्यापक उचलत आहेत. शासनाकडून एक दमडीही शाळांंना दिली जात नाही.ज्या शाळा हरीत सेनेत समाविष्ट आहेत, अशा सर्व शाळांना दोन हजार पाचशे रुपये दिले जायचे. आता त्या निधीत एक हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे वृक्ष लागवड करण्याचा खर्च पेलला जाईल का? असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.शासनाने वृक्ष लागवडीसाठी शाळेत खड्डे खोदण्याकरिता अनुदान द्यावे किंवा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांद्वारे खड्डे खोदण्याचे काम करण्यात यावे.तसेच शाळांना वृक्ष लागवडीकरिता रोपे मोफत पुरविली जावी. त्या वृक्षांना संरक्षण देण्यासाठी खासगी व जिल्हा परिषद शाळांना ट्री गार्ड पुरविण्यासाठी खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निधीतून साहित्य देण्यात यावे. झाडे लावा व जगवा असे सांगितले जाते. पण उन्हाळ्यात अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई आहे. अनेक शाळांत पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद शाळांसह खासगी शाळांत पाणी टंचाई भेडसावत आहे. तिथे हातपंप, बोअरवेल देण्याची योजना राबविण्यात यावी. अनेक शासनाच्या महत्वपूर्ण योजनेत खासगी व जिल्हा परिषद असे अंतर केले जाते.विविध योजनेतील मिळणारी सापत्न वागणूक बंद केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तथापि वृक्ष लावण्यासाठी भर उन्हात गुरुजी खड्डे खोदण्याच्या कामाला लागल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात सुरु आहे.