शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

युती सरकारला धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 22:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांचे कर्ज अद्यापही माफ झाले नाही. वेळेवर कर्ज न मिळाल्याने शेतकºयांना ...

ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : भंडगा येथे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ४० हजार शेतकऱ्यांचे कर्ज अद्यापही माफ झाले नाही. वेळेवर कर्ज न मिळाल्याने शेतकºयांना नवीन पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहावे लागले आहे. तर अकाली पावसामुळे नुकसान होवून देखील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही.केंद्र व राज्यातील भाजपा शिवसेना युती सरकारने केवळ शेतकऱ्यांना मोठी आश्वासने देवून त्यांची दिशाभूल करण्याचे काम केले. हे सरकार शेतकरी हिताचे नसून उद्योजकांच्या हिताचे आहे. त्यामुळे या भाजपा सरकारला जनतेनेच धडा शिकवावा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.तालुक्यातील भंडगा येथे आयोजित नाटकाच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी महेंद्र मोटघरे, डुमेश चौरागडे,अविनाश बिसेन, लक्ष्मण चंद्रिकापुरे, शिवाजी ईश्वार, राकेश बघेले, सरपंच सोमेश रहांगडाले,संजूबाई बडोले, रजनी दमाहे, एन.के. बघेले, खोमेश टेंभरे उपस्थित होते.चंद्रिकापुरे म्हणाले, राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेचा गाजावाजा केला. परंतु प्रत्यक्षात कुठेही सिंचनाची सोय उपलब्ध करु न देण्यात आली नाही.युवकांना वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देवून सुद्धा आतापर्यंत केवळ ६ लाख युवकांना रोजगार देण्यात आला. प्रत्यक्षात ८ कोटी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे होता. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. शेतकरी आपल्या तरु ण मुलांना शिक्षण देण्यासाठी जिवाचे रान करतात व त्यांच्या वृद्धपकाळात मदत होईल असे स्वप्न बघतात.मात्र मोदी सरकारने बेरोजगारांना रोजगार देण्याऐवजी त्यांचा रोजगार हिरावण्याचे काम करीत आहे.त्यामुळे अशा विश्वासघातकी सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले.संचालन उमाकांत मोटघरे यांनी केले तर आभार दिलिप खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन शरणागत, भरत दमाहे, लालचंद खोब्रागडे, मीताराम कवास, भरत भोयर, राकेश मस्करे,गुन्नीलाल नंदेश्वर देवाजी मांढरे, राकेश मस्करे व मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जNCPराष्ट्रवादी काँग्रेस