शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांवर पडणार कराचा बोजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:47 IST

शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या भुयारी गटार योजनेचा सध्या चांगलाच गाजावाजा होत आहे. एकीकडे ही योजना शहरासाठी वरदान ठरणार असतानाच योजनेमुळे शहरवासीयांच्या खिशाला कात्रीही लागणार आहे. योजनेंतर्गत शहरवासीयांवर सेवरेज जोडणी शुल्क आकारले जाणार आहे.

ठळक मुद्देसेवरेज जोडणी शुल्क आकारणार : नगर परिषद करणार वसुली, तिप्पट वाढणार कर

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या भुयारी गटार योजनेचा सध्या चांगलाच गाजावाजा होत आहे. एकीकडे ही योजना शहरासाठी वरदान ठरणार असतानाच योजनेमुळे शहरवासीयांच्या खिशाला कात्रीही लागणार आहे. योजनेंतर्गत शहरवासीयांवर सेवरेज जोडणी शुल्क आकारले जाणार आहे. परिणामी, मालमत्ता करासोबत आता सेवरेज जोडणीचा कर शहरवासीयांना भरावा लागणार आहे. यामुळे शहरवासीयांना धडकी भरली आहे.केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत शहराला भुयारी गटार योजना मंजूर करण्यात आली आहे. दोन टप्प्यात केली जाणारी ही योजना सुमारे २६५ कोटींची असून साऊथ झोन प्रकल्पाची अंदाजपत्रकीय किंमत १३४ कोटी आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून ५० टक्के, राज्य शासनाकडून २५ टक्के तर नगर परिषदेला २५ टक्के हिस्सा द्यावयाचा आहे. नगर परिषदेला ३३.५१ कोटी रूपये भरावयाचे आहेत. ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडून कार्यान्वीत केली जाणार आहे. सदर भुयारी गटार योजना प्रकल्प सुरू झाल्यावर नागरिकांक डून सेवरेज जोडणी वापर शुल्क (सेस) घेतले जाणार आहे. यासाठी मजीप्राने जोडणी शुल्कचा एक आराखडा तयार केला आहे. यात चौरसफुट निहाय मालमत्तेवर सेस आकारले जाणार आहे. त्यानुसार हे शुल्क वसुल करावयाचे आहे. त्याची जबाबदारी नगर परिषदेकडे देण्यात आली आहे. यामुळे, आता शहरवासीयांना मालमत्ता कर द्यावा लागत असतानाच भुयारी गटार योजनेसाठी सेसही भरावे लागणार आहे. एकंदर भुयारी गटार योजना फायद्याची असतानाच या योजनेचा ताण मात्र शहरवासीयांवर येणार आहे.विशेष विभागाची स्थापनामहाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत या प्रकल्पाचे व्यवस्थापन व देखभाल केली जाणार असतानाच सेस वसुलीची जबाबदारी मात्र नगर परिषदेकडे देण्यात आली आहे. येथे भुयारी गटार योजनेच्या सेसची आकारणी व वसुली करून मजीप्राला द्यावयाची आहे. भुयारी गटार योजनेचा पूर्ण हिशोब वेगळाच ठेवावा लागणार आहे. त्यासाठी यंत्रणाही उभी करावी लागेल. नगर परिषदेकडे तेवढे मनुष्यबळ नसल्याने आता भुयारी गटार योजनेसाठी विशेष विभागाचे स्थापन करावा लागणार आहे. 

टॅग्स :Taxकर