शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

एका केंद्रावर 100 जणांना लसीकरणाचे टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 05:00 IST

कोविड लसीकरणासाठी टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची दररोज बैठक घेतली जात आहे. यात लस आल्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया पार पाडताना कुठलीही अडचण होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी अशा एकूण ८५०० जणांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्याला १० हजार २०० लस उपलब्ध झाले आहेत. 

ठळक मुद्देलाँचिंग ड्राईव्ह १६ रोजी : फ्रंट लाईन वारियर्सला प्राधान्य, जिल्ह्यात १० हजार २०० लस उपलब्ध

 लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  फ्रंट लाईन कोरोना वारियर्सला कोविड लसीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. १६ जानेवारीला जिल्ह्यातील एकूण सहा केंद्रावरुन लसीकरणाची प्रक्रिया पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात कोव्हिन अ‌ॅपवर नोंदणी करणाऱ्यास लसीकरण केले जाईल. एका केंद्रावरुन शंभर आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. कोविड लसीकरणासाठी टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची दररोज बैठक घेतली जात आहे. यात लस आल्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया पार पाडताना कुठलीही अडचण होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी अशा एकूण ८५०० जणांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्याला १० हजार २०० लस उपलब्ध झाले आहेत. जिल्ह्याला लस प्राप्त झाल्यानंतर शहरी भागात लसीच्या साठवणुकीसाठी १२ तर ग्रामीण भागात १० कोल्ड चैन पाॅईंटची व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर सुरक्षेच्या सर्व कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक केंद्रावर आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचारी व गार्ड लसीकरण अधिकारी ३ असे पाच जणांचे पथक तैनात राहणार आहे. पर्यवेक्षक व डॉक्टर सुपर व्हिजनकरिता राहणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश माेहबे यांनी सांगितले. माता बालसंगोपन अधिकारी डॉ. पांचाळ यांनी स्लाईड शो द्वारे कोविड लसीकरणाच्या लाँचिंग प्लानची माहिती दिली. ग्रामीण भागासाठी ग्रामीण रुग्णालयात लसीकरण बूथ राहणार आहे. प्रत्येक तालुका वैद्यकीय अधिकारी व अधीक्षक लसीकरणाचे समन्वय करतील. कोविड १९ लसीकरणाच्या लाँचिंग प्लानची सविस्तर माहिती आणि जनजागृती याबद्दल डॉॅ. सुवर्णा हुबेकर यांनी माहिती दिली.सर्वच बाबींची चाचपणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता नरेश तिरपुडे  यांनी लसीकरणानंतर जर साईड इफेक्ट झाले तर काय करावे याबाबत मार्गदर्शन केले. आयएमएच्या अध्यक्ष डॉ. प्रणिता चिटनवीस यांनी सुद्धा जिल्हा टास्क फोर्समध्ये मार्गदर्शन केले. लसीकरणानंतरच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यात आल्या.या केंद्रावर होणार लसीकरण १६ जानेवारी रोजी गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बाई गंगाबाई महिला रुग्णालय, तिरोडा उपजिल्हा रुग्णालय, देवरी व सडक अर्जुनी आणि खमारी प्राथमिक आरोग्य केंद्र खमारी येथे लसीकरण बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. 

ज्यांची पोर्टलवर एन्ट्री त्यांनाच लस ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हिन पोर्टलवर नोंदणी केली आहे, त्यांनाच लसीकरण करण्यात येणार आहे. अधिकृत ओळखपत्राशिवाय कोविड लस मिळणार नाही. लस दिल्यानंतर ३० मिनिटे निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. आज पुन्हा ड्राय रन कोविड लसीकरणाची प्रक्रिया आता अंतिम टप्यात आली असून प्रत्यक्षात लसीकरणा दरम्यान कुठलीही अडचण येऊ नये यासाठी गुरुवारी (दि.१४) गोंदिया शासकीय महाविद्यालय, तिरोडा जिल्हा रुग्णालय, देवरी, सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी १० वाजता ड्राय रन घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी टास्क फोर्सकडून घेतला आढावाकाेविड लसीकरण प्रक्रियेला घेऊन सर्वच आवश्यक बाबींची चाचपणी केली जात आहे. यात कसल्याही त्रुटी राहू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना आणि अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी मंगळवारी टास्क फोर्सकडून आढावा घेतला.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस