गोंदिया : देवरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापतीपदासाठी शनिवारी निवडणूक झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रमेश ताराम यांची सभापती तर उपसभापतीपदी विजय कच्छप यांची अविरोध निवड झाली.दोन्ही पदांकरिता एक-एकच अर्ज आले होते. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी अविरोध निवड घोषित केली. या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देवरीत विजयी रॅली काढली. त्यात तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी होते.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित सभापती-उपसभापतींचे स्वागत आ.राजेंद्र जैन, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, भंडारा अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष महेश जैन, जि.प.चे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे, गोपाल तिवारी, केशवराव भुते आदींनी केले.यावेळी बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक दुर्गा तिराले, अंशुल अग्रवाल, गोपाल राऊत, हरिराम राऊत, द्वारका धरमखुडे, भास्कर धरमसहारे, भैयालाल चांदेवार, रक्षा ककोडी, सिराजभाई खान, केशव मडावी, पुनियाबाई मडावी, अनिल वालदे, बंटी भाटीया, नेमीचंद आंबीलकर, रितेश अग्रवाल, चंचल जैन, सी.के. बिसेन, आफताब शेख आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
देवरी बाजार समितीच्या सभापतिपदी ताराम अविरोध
By admin | Updated: September 20, 2015 02:12 IST