शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जलयुक्त शिवार लोकचळवळ झाल्यास टँकरमुक्ती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 20:54 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेली जलयुक्त शिवार योजना महत्वाकांक्षी व राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आखलेली योजना आहे. परंतु जिल्ह्यातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद न लाभल्याने या योजनेची कासवगतीने वाटचाल सुरु आहे.

ठळक मुद्देजलस्रोतांनी गाठली धोक्याची पातळी : तलावांच्या जिल्ह्यात पाणी टंचाईचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेली जलयुक्त शिवार योजना महत्वाकांक्षी व राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी आखलेली योजना आहे. परंतु जिल्ह्यातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद न लाभल्याने या योजनेची कासवगतीने वाटचाल सुरु आहे.संपूर्ण महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशन, शासन आणि जनतेच्या मदतीने मराठवाड्यासह, दुष्काळी भागात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात पाणी अडवण्यासाठी लोकचळवळ सुरु आहे. सरकारच्या मदतीने जनता काम करीत आहेत. भविष्यात होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार ही लोकचळवळ झाल्याशिवाय जलस्त्रोतांमध्ये वाढ होणार नाही. दुष्काळ हटविण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न होत असले तरी जिल्हावासीयांकडून याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. आताही मानसिकता बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान व त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम या सर्व बाबींचा विचार करता पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व वृक्ष लागवडीसाठी अनेक सामाजिक संस्था, डॉक्टर, विद्यार्थी व शाळा कॉलेजासह सर्वसामान्य जनतेने यासाठी दृढसंकल्प करणे गरजेचे आहे.अनेक वर्षांपासून शासन जलसंधारणाचे काम करीत आहे. मात्र अद्यापही पाणी टंचाईवर मात करता आली नाही. त्यामुळे ही जनचळवळ होऊन गावागावात शासन व जनतेच्या मदतीने अनेक सामाजिक संस्थांच्या श्रमदानातून जलसंधारणासाठी नदी-नाले, तळे खोलीकरणाची कामे झाली पाहिजेत. जी गावे पाण्यासाठी एकी दाखवून एकत्र आले त्या गावांचा आज चेहरामोहराच बदलून गेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाणी फाऊंडेशन, वॉटर कप स्पर्धेतून अनेक तालुक्यांमध्ये ओढे, नाले, तळी यांचे रुंदीकरण व खोलीकरणाची कामे युध्दपातळीवर सुरु आहेत.पाण्यासाठीची ही चळवळ लोकचळवळ झाली तरच शेतकºयांच्या माथी असलेला दुष्काळाचा (पाण्याचा) कलंक पुसला जाईल. जलयुक्त शिवारची कामे झाल्यास आज बोअरवेलची वाढणारी स्पर्धा, जिल्ह्यात असणाºया विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होईल. त्याचा फायदा पिकांना झाल्यास शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ होईल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. जलसाठ्याचे रुंदीकरण, खोलीकरण झाल्यास पाणी पावसाळ्यात वाहून न जाता जलसाठ्यात साठून राहणार आहे. याचा फायदा निश्चितच आसपासच्या शिवारातील लोकांना होणार आहे.पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्याने नैसर्गिक तलाव, बोड्या जानेवारी महिन्यातच कोरड्या पडतात. उन्हाळ्यात पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर येते. खंड पडणाºया पावसामुळे रोवणीचा हंगाम लोटला तरी रोवणीसाठी पुरेसे पाणी मिळत नाही. पाण्याचा दुष्काळ संपविण्याची क्षमता जलयुक्त शिवार योजनेत आहे. फक्त या योजनेसाठी लोकचळवळ होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास श्रमदानामुळे गावे पाणीदार होतील. त्यामुळे दुष्काळाची चिंता जाणवणार नाही. शहराला पिण्याच्या पाण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे. जलयुक्त शिवार लोकचळवळ झाल्यास शहराजवळील ओढे, नाले, तलाव व विहिरींचे खोलीकरण व रुंदीकरण करुन पाणी अडवा, पाणी जिरवा ही मोहीम सर्वस्तरातून राबविल्यास शहराला भेडसावणाºया पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. पाणी पातळीत वाढ होईल. शहरवासीयांची पाणी समस्या मिटविण्यासाठी नगरपरिषदेसह, शहरवासीयांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. पण आता ही मानसिकता बदलून पाण्यासाठी एकवटलेच पाहिजे अन्यथा भविष्यात पाण्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागेल.